तृणमूल काँग्रेसची राष्ट्रपतींकडे धाव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोलकाता : जगदीप धनखार यांना पश्चिम बंगालच्या राज्यपालपदावरून हटविण्यात यावे, या मागणीसाठी तृणमूल काँग्रेसने बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे धाव घेतली. राज्य प्रशासन आणि सरकारविरुद्ध सातत्याने जाहीर वक्तव्ये करून धनखार यांनी आपल्या घटनात्मक मर्यादेचे उल्लंघन केले असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

तथापि, धनखार आपल्या घटनात्मक मापदंडानुसार काम करीत असून तृणमूल काँग्रेस भयभीत झाली आहे, असे भाजपने म्हटले आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी मंगळवारी राष्ट्रपतींना पत्र पाठविले आहे, त्यामध्ये राज्यपालांकडून करण्यात आलेल्या मर्यादांच्या उल्लंघनांचा पाढा वाचण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रपतींनी घटनेतील अनुच्छेद १५६ मधील कलम एकनुसार कारवाई करावी, अशी विनंती राष्ट्रपतींना करण्यात आल्याचे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी येथे वार्ताहरांना सांगितले.

णणे काय?

’ गेल्या वर्षी जुलै महिन्यात राज्यपालपदाची धुरा स्वीकारल्यापासून धनखार नियमितपणे ट्वीट करीत आहेत, पत्रकार परिषदा घेत आहेत आणि दूरचित्रवाणी वाहिनीवरील चर्चामध्ये सहभागी होत आहेत आणि राज्य सरकार, आमचे अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांविरुद्धही वक्तव्ये करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.

’ त्यांची प्रत्येक कृती घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन करणारी आहे, असे तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार सुखेंदू शेखर रॉय यांनी म्हटले आहे.

’ राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून धनखार जाहीरपणे वक्तव्ये करीत आहेत, असा आरोपही रॉय यांनी केला आणि ७५ वर्षांच्या पश्चिम बंगालच्या इतिहासात असा प्रकार कधीही घडला नसल्याचे ते म्हणाले.

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc writes to president ram nath kovind demands removal of bengal governor jagdeep dhankhar zws
First published on: 31-12-2020 at 03:53 IST