काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर, राज्यसभा निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांचा मतदारसंघ असलेला रायबरेतील जनतेसाठी खास पत्र लिहिलं असून त्यामार्फत भावनिक साद घातली आहे.

सोनिया गांधींनी पत्रात म्हटलं की, “दिल्लीत माझे कुटुंब अपूर्ण आहे. मी रायबरेलीला येते आणि तुम्हा सर्वांना भेटते, तेव्हा हे माझं अूर्ण कुटूंब पूर्ण होतं. हे जवळचे नाते खूप जुने आहे आणि मला ते माझ्या सासरच्या मंडळींकडून मिळाले आहे. रायबरेलीशी आमच्या कुटुंबाचे संबंध खूप खोल आहेत.”

Pankaja Munde
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडेंची भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी आज थोडी गंभीर, मला शब्दामध्ये…”
Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
priyanka gandhi
‘महत्त्वाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवा’
Jalna lok sabha election २०२४, congress, Dr kalyan kale
डॉ. कल्याण काळे यांच्या उमेदवारीने जालन्याची लढत आता लक्षवेधक ठरणार

“स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही माझे सासरे फिरोज गांधी यांना येथून विजयी करून दिल्लीला पाठवले. त्यांच्यानंतर तुम्ही माझ्या सासू इंदिरा गांधी यांना आपलेसे केले. तेव्हापासून आजतागायत ही मालिका आयुष्यातील चढ-उतार आणि खडतर वाटेवरून प्रेमाने आणि उत्साहाने सुरू राहिली आहे आणि आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे”, असं सोनिया गांधी म्हणाल्या.

हेही वाचा >> Sonia Gandhi: ठरलं! सोनिया गांधी राजस्थानमधून लढवणार राज्यसभेची निवडणूक, लोकसभा निवडणुकीतून माघार

“तुम्ही मलाही या उज्ज्वल वाटेवर चालायला संधी दिलीत. माझी सासू आणि माझा जीवनसाथी कायमचा गमावल्यानंतर मी तुमच्याकडे आले आणि तुम्ही मला मदतीचा हात दिलात. मागच्या दोन निवडणुकांत खडकाप्रमाणे तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात, हे मी कधीच विसरू शकत नाही. मला सांगायला अभिमान वाटतो की आज मी जी काही आहे ते तुमच्यामुळेच आहे आणि या विश्वासावर कायम राहण्याचा मी प्रयत्न केला आहे”, असं म्हणत सोनिया गांधी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

“आता प्रकृती आणि वाढत्या वयामुळे मी पुढील लोकसभा निवडणूक लढवणार नाही. या निर्णयानंतर मला तुमची थेट सेवा करण्याची संधी मिळणार नाही, पण माझे मन आणि आत्मा सदैव तुमच्या पाठीशी राहील हे निश्चित. मला माहीत आहे की, तुम्ही सुद्धा माझी आणि माझ्या परिवाराची प्रत्येक अडचणीत काळजी घ्याल, जशी तुम्ही आजवर माझी काळजी घेत आहात”, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सोनिया गांधींनी भरला राज्यसभेचा अर्ज

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी अखेर राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखला केला. सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका गांधी तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते बुधवारी सकाळी जयपूरला आले. राजस्थानमधून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राज्यसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या निवृत्तीमुले रिक्त झालेल्या जागेसाठी सोनिया यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या निवडणुकीत विजय मिळाला तर राज्यसभेच्या खासदार झालेल्या नेहरू-गांधी यांच्या आधी उमा नेहरू (१९६२-६३), इंदिरा गांधी (१९६४-६७) या दोन्ही नेहरू-गांधी कुटुंबातील सदस्य राज्यसभेच्या खासदार होत्या.