माढा मतदार संघातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे लोकसभा निवडणूक लढवणार होते, मात्र त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला. मात्र पुन्हा एकदा माढा मतदारसंघ चर्चेत आला असून तिथे टॉयलेट मॅन म्हणून ओळख असणारे उद्योजक रामदास माने हे निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ध्यास माढा विकासाचा, आवाज सर्वसामान्यांचा…या ब्रीद वाक्याखाली टॉयलेट मॅन रामदास माने हे अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. महाराष्ट्रात त्यांची ओळख मोठी आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा ते यशस्वी उद्योजक अशी त्यांची ओळख आहे. रामदास माने यांनी तब्बल २५ नववधूंच्या विवाहात मोफत शौचालय देऊन एक सामाजिक संदेश दिला होता. तर महाराष्ट्रासह इतर १७ राज्यात थर्माकॉलचे 23 हजार शौचालय ना नफा ना तोटा या तत्वावर दिली होती. त्यामुळे रामदास माने यांची ओळख महाराष्ट्रभर झाली आहे.

रामदास माने यांचा व्यवसाय हा पिंपरी-चिंचवड शहरात असून ते मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. वडील शेतकरी असून घरात सर्व जण अंगठे बहाद्दर त्यामुळे त्यांनी शिक्षण घ्यायचं ठरवलं आणि आईकडे शिक्षणाचा हट्ट धरला.त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेऊन आयटीआयमध्ये वायरमन ट्रेडचे शिक्षण घ्यायचे ठरवले. शिक्षण सुरू असताना रात्रपाळीला त्यांनी काम करत पैसे जमवले. चांगल्या गुणांनी ते पास झाले. पुढे चालून ते पिंपरी-चिंचवड शहरात आले आणि स्वतः नशीब अजमावल आज ते थर्माकॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्याचे मालक असून तीन वेळेस जगभ्रमंती केली आहे.

आता ते माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असून त्यांना तेथील तरुणांना रोजगार देण्याचं ठरवलेलं आहे. त्यांचा हाताला काम द्यायचं आहे असं माने म्हणाले. एकीकडे ते यशस्वी उद्योजक असून त्यांना नागरिकांचा पाठिंबा मिळतो की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toilet man ramdas mane to fight lok sabha election from madha
First published on: 10-04-2019 at 16:40 IST