१. नवीन पटनायक यांना पुन्हा सत्ता?
आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू आणि ओदिशात नवीन पटनायक पुन्हा सत्तेत येणार का, याची उत्सुकता आहे. मतदानोत्तर चाचण्यांमध्ये आंध्रात चंद्राबाबू यांचा पराभव होऊन जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत येईल, तर ओदिशात नवीन पटनायक हे सत्ता कायम राखतील, असा अंदाज आहे. वाचा सविस्तर :

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२. मतदानोत्तर चाचण्यांमुळे मतमोजणीची उत्सुकता वाढली
मतदानात्तोर चाचण्यांचे अंदाज विविध वृत्तवाहिन्यांवर वर्तविण्यात येत असल्याने सर्वाचे लक्ष आता प्रत्यक्ष मतमोजणीकडे लागले आहे. २३ मे रोजी गुरूवारी जिल्ह्य़ातील नागपूर आणि रामटेक लोकसभा निवडणुकीची मतमोजणी कळमना बाजार समितीत होणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. वाचा सविस्तर : 


३.विदर्भातील शेतकऱ्यांभोवतीचा आत्महत्येचा फास कायम
२०१४ पूर्वी विदर्भातील शेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे भांडवल करून भाजप केंद्रात व राज्यात सत्तेत आला. मात्र, सत्ता परिवर्तनानंतर शेतकऱ्यांच्या परिस्थितीत बदल घडण्याऐवजी अधिक भीषण अवस्था निर्माण झाली आहे. वाचा सविस्तर : 

४.World Cup 2019 : पाकिस्तानच्या संघात ऐनवेळी ३ बदल; वहाब, आमिरला संधी
इंग्लंडमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला अवघे १० दिवस शिल्लक आहेत. सर्वच संघ आपल्या खेळाडूंचा कसून सराव करून घेत आहेत. प्रत्येक संघाला आधी जाहीर केलेल्या संघात कोणतीही परवानगी न घेता २३ मे पर्यंत बदल करण्याची मुभा देण्यात आली आहे. वाचा सविस्तर : 


५.कल आणि कौल
बहुतेक मतदानोत्तर पाहण्यांच्या निष्कर्षांची दिशा ‘रालोआ सत्ता राखणार’ अशीच असून ती निर्विवादच असू शकते. परंतु अनेक पाहण्या एकमेकींशी ताडून पाहिल्यास दिसणारी तफावत मात्र, केवळ आश्चर्यकारकच नाही तर त्या पाहण्यांच्या शास्त्रीयतेवरही प्रश्न निर्माण करणारी आहे. वाचा सविस्तर : 

 

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Top five morning news bulletin editorial on lok sabha elaction exit poll
First published on: 21-05-2019 at 08:00 IST