देशभरात ३ हजार ९०० नवे करोना रुग्ण, १९५ मृत्यू, संख्या ४६ हजार ४०० च्याही पुढे

देशभरात १ हजार २० रुग्णांना गेल्या २४ तासात डिस्चार्ज देण्यात आला आहे

संग्रहित छायाचित्र

देशभरात करोनाचे ३ हजार ९०० नवे रुग्ण गेल्या २४ तासात पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातल्या करोनाग्रस्तांची संख्या ४६ हजार ४३३ इतकी झाली आहे. देशभरात गेल्या २४ तासात १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.

देशात मागील २४ तासांमध्ये १ हजार २० लोक बरे झाले आहेत. त्यामुळे देशभरात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १२ हजार ७२६ झाली आहे. असंही आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Total number of positive cases of covid19 is 46433 in india last 24 hours there have been 3900 new cases 195 deaths and 1020 people have recovered scj

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या