वाहतूक कोंडीची समस्या हा आपल्या देशात दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला प्रश्न आहे.त्यामुळे यावर लवकरच उपाय योजणं आवश्यक आहे. तसं झालं नाही तर हा प्रश्न आणखी गंभीर होईल. बंगळुरुतल्या एका तरुणाने रेडइटवर पोस्ट लिहिली आहे. जी चांगलीच व्हायरल झाली आहे. या तरुणाने म्हटलं आहे की मी वर्षाला २८ लाख रुपये कमावतो त्यातले साधारण ६ लाख रुपये कर भरणा करतो आणि १ लाख ४० हजारांचा जीएसटी भरतो. आता मला ट्रॅफिकच्या रुपाने नवा कर भरावा लागतो आहे असं या तरुणाने म्हटलं आहे. वाहतूक कोंडीची समस्या ही अनेक शहरांमध्ये भेडसावते आहे. बंगळुरुही त्याला अपवाद नाही. बंगळुरुतल्या एका तरुणाने रेड इट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहिली आहे जी व्हायरल झाली आहे.

काय आहे तरुणाची पोस्ट?

बंगळुरुमधल्या एका तरुणाने पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये हा तरुण म्हणतो मी जिथे राहतो तिथून माझं ऑफिस १४ किमी अंतरावर आहे. साधारण अर्धा तास किंवा ३५ मिनिटं जायला लागतात. मात्र वस्तुस्थिती आहे की मला रोज दीड तास लागतो. जायला दीड तास आणि यायला दीड तास. मी वर्षातले अडीच महिने ट्रॅफिकमध्ये बसून घालवतो. ट्रॅफिक हा नवा कर आहे असं या तरुणाने म्हटलं आहे. सुरुवातीला चांगले रस्ते बांधायचे म्हणून कर लादण्यात आला. त्यानंतर आता वाहतूक कोंडी सुरु आहे. त्यामुळे वाहतूक हा नवा कर झाला आहे. वर्षातले अडीच महिने मी वाहतूक कोंडीत बसून घालवतो असं म्हणत या तरुणाने रेड इट पोस्ट केली आहे. ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

नेटकरी काय म्हणत आहेत?

या पोस्टनंतर नेटकरी व्यक्त होत आहेत. एकाने म्हटलं आहे की बंगळुरुमध्ये विदेशासारखे रस्ते तयार करत आहेत. ते अत्यंत स्वच्छ आणि वाहतूक कोंडी नसलेले असतील. दुसऱ्या एकाने म्हटलं आहे सध्या इथे लोकांना खोकला, सर्दी झाली आहे, शिंका येत आहेत, मुलं आजारी पडत आहेत प्रदूषणाचा विळखा शहराला बसला आहे. आणखी एकाने म्हटलं आहे की राजकारणी लोकांमुळे हे घडतं आहे. लोकसंख्या वढते आहे आणि शहरांवरचा तसंच व्यवस्थेवरचा ताण वाढतो आहे असंही काहींनी म्हटलं आहे. तसंच त्या तरुणाला काहींनी सगळं काही नीट होईल फार काळजी करु नको वगैरे म्हणत दिलासा देण्याचाही प्रयत्न केला आहे.