पीटीआय, वॉशिंग्टन

अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या स्थलांतरितांना त्यांच्या देशात परतण्यासाठी ट्रम्प प्रशासन १००० डॉलर देणार आहे. सध्या ट्रम्प प्रशासन मोठ्या प्रमाणात हद्दपारीच्या अजेंड्यावर काम करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकी गृह विभागाने सोमवारी सांगितले की, ते स्थलांतरितांना प्रवास मदतीसाठीही पैसे देत आहेत. सीबीपी होम अॅपचा वापर करून जे स्थलांतरित सरकारला घरी परतण्याबाबत माहिती देतील, त्यांना ताब्यात घेऊन जबरदस्तीने अमेरिका सोडण्यास भाग पाडले जाणार नाही. अध्यक्ष ट्रम्प यांनी स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्यासाठी मोठी मोहीम सुरू केली असून पैसे देऊन स्वखुशीने देश सोडण्यावरही भर दिला जात आहे.