Turkey Earthquake: टर्की आणि सीरियामध्ये भीषण भूकंप आल्यानंतर मृत्यूचे तांडव पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ४१ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. तर लाखो लोक या भूकंपामुळे बेघर झाले आहेत. टर्की आणि सीरियाला मदत करण्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. हा भूकंप इतका जबरदस्त होता की, अनेक इमारती पत्त्याप्रमाणे कोसळल्या. यासोबत मोबाइल टॉवरचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ज्याठिकाणी भूकंपाचे धक्के बसले, तिथला संपर्क यामुळे तुटला आहे. दळणवळण, दूरसंचार, इंटरनेट अशा सुविधांनाही फटका बसलेला आहे. तरिही भारताचे एनडीआरएफचे जवान भारताच्या संपर्कात आहेत, याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटते. NDRF ने भारताशी संपर्क साधण्यासाठी संचार डिव्हाईसची मदत घेतली आहे.

हे वाचा >> “काऊंटडाऊन सुरु झालाय…” एसटी कामगारांच्या पगारावरुन गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आमचेच सरकार पगार…”

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

टर्कीमधील संहारक भूकंपाची माहिती मिळताच भारतानं ‘ऑपरेशन दोस्त’च्या अंतर्गत तिथे तातडीनं आर्मी मेडिकल टीम, नॅशनल डिजास्टर रिलीफ फोर्स (NDRF)च्या तुकड्या आणि वैद्यकीय मदत पाठवली. भारतानं टर्कीला मदत पाठवण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांत भारतीय वायूदलाची विमानं टर्कीच्या दिशेनं झेपावली. “क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट टीम, ऑर्थोपियाडिक सर्जिकल टीम, जनरल सर्जिकल टीम, मेडिकल स्पेशालिस्ट टीम आणि इतर मेडिकल टीम या विमानांमधून टर्कीमध्ये दाखल झाली आहेत”, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली होती. भारताकडून भूकंपग्रस्त भागात गेलेली टीम भारतीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. टर्कीची दूरसंचार यंत्रणा विस्कळीत झाली असली तरी संचार डिव्हाईसच्या माध्यमातून भारताशी संपर्क साधला जात आहे.

हे वाचा >> घरच्यांना न सांगता व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी गोव्यात गेले, प्रेमीयुगुलाचा समुद्रात बुडून मृत्यू

भारताने तातडीने पाठविलेल्या मदतीबद्दल टर्कीने आभार मानले आहेत. टर्कीमध्ये गेलेले भारतीय जवान कॅप्टन करण सिंह आणि पी.जी. सप्रे यांच्या पथकाने भारताशी संपर्क साधण्यासाठी एक स्वतंत्र, रिअल टाइम ट्रॅकिंग आणि मॅसेजिंग मोड्यूल “संचार डिव्हाईस” विकसित केले आहे.

या डिव्हाईसचा वापर करुन सुरक्षा दल आणि अर्धसैनिक दल युद्ध क्षेत्रात आपल्या सहकाऱ्यांना शोधून काढतात. हे डिव्हाईस भारतीय सैनिकांना युद्ध क्षेत्र किंवा इतर आपत्कालीन परिस्थितीत संपर्क सैनिकी तळाशी मदत करत आहे. विशेष म्हणजे सैन्यातील जवानांनीच या डिव्हाईसला तयार केले आहे. याच्या माध्यमातून लोकेशन शोधणे, आपत्कालीन परिस्थितीचा अंदाज काढणे आणि आणीबाणीच्या प्रसंगात मदत पोहोचवणे यासारखी महत्त्वाची कामं केली जात आहेत.