Mahsa Amini Death: तुर्की गायिका मेलेक मोस्सोने इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ एका स्टेज शो दरम्यान मेलेकने केस कापले आहेत. तिच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जगभर व्हायरल झाला आहे. इराणमध्ये हिजाब संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २२ वर्षीय महसा अमिनी या तरुणीला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर इराणमधील महिलांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला जगभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.

Iran Hijab Protest: इराणी तरुणींनी पर्शियन भाषेत गायलं Bella Ciao; कारणही तितकंच खास, पाहा Viral Video

इराणच्या जवळपास ४६ शहरांमध्ये हे आंदोलन केले जात आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या समर्थनार्थ हिजाब हटवून केस कापतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक महिलांकडून पोस्ट केले जात आहे. जगभरातील सेलिब्रेटी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

विश्लेषण: रस्त्यावर उतरून महिलांनी स्वतःचे केस कापले, हिजाब जाळले; इराणमध्ये नेमकं घडतंय काय?

महसा अमिनीसोबत काय घडलं?

महसा अमिनी या २२ वर्षीय तरुणीला इराणच्या संस्कृतीरक्षक पोलिसांनी हिजाब नीट न परिधान केल्यामुळे अटक केली होती. अटकेनंतर या तरुणीची प्रकृती खालावली आणि ती कोमात गेली. रुग्णालयात उपचारांदरम्यान या तरुणीने जीव गमावला. कट्टरपंथीय संस्कृतीरक्षकांनीच अमिनीचा जीव घेतला असल्याचा आरोप करत संतप्त इराणी महिलांकडून हिजाब विरोधात उग्र आंदोलन करण्यात येत आहे.

इराणमध्ये हिजाबचे नियम काय आहेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इराणमध्ये सार्वजनिक ठिकाणी हिजाब न घालणे इस्लामिक हिजाब नियमांनुसार दंडनीय गुन्हा आहे. १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपासून, इराणच्या कायद्यानुसार राष्ट्रीयत्व किंवा धार्मिक श्रद्धेचा विचार न करता सर्व महिलांनी केस, डोके आणि मान झाकणारा हिजाब घालणे आवश्यक आहे.