भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाशी संलग्न असलेल्या गांधी स्मृती संस्थेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अंतिम जन’ नावाची विशेष पत्रिका प्रसिद्ध केली आहे. ही पत्रिका वीर सावरकरांना समर्पित आहे. मात्र, या पत्रिकेला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येत आहे. महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी या विशेष अंकावर टीका केली आहे. गांधीवादी विचारधारा भ्रष्ट करण्यासाठी ही पत्रिका काढल्याचा आरोप तुषार गांधी यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- अफ्रिकेतील घाणा देशात नव्या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग, मृत्यूदर तब्बल ८८ टक्के, WHO चाही इशारा

गांधी स्मृती संस्थेकडून सावरकरांचे कौतुक

गांधी स्मृती संस्था ही केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येते. ही संस्था पूर्णपणे गांधी आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाला समर्पित आहे. हीच संस्था राजघाटावरील गांधी स्मारक आणि गांधींची हत्या झालेल्या घराचे (सध्याचे संग्रहालय) संवर्धन देखील करते. विषेश म्हणजे गांधी आणि सावरकरांची विचारधारा एकमेकांच्या विरुद्ध आहे. गांधी स्मृती संस्थेने सावरकरांचे कौतुक करणारी पत्रिका काढल्यामुळे टीका करण्यात येत आहे. या पत्रिकेत वीर सावरकरांच्या स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित १३ लेख प्रकाशित झाले आहेत. तर महात्मा गांधींवर केवळ ३ लेख आहेत.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर राऊतांचा टोला, म्हणाले “अस्वस्थ असल्याने…”; फुटीरांना प्रोत्साहन देणारं नेतृत्व म्हणत मोदींवरही टीकास्त्र

आरएसएसचा अजेंडा असल्याचा आरोप

तुषार गांधी यांनी महात्मा गांधींच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर मोठे संशोधन केले आहे. त्यांनी गांधींवर अनेक पुस्तकेही लिहिली आहेत. द हिंदूच्या वृत्तानुसार, तुषार यांनी सावरकरांना समर्पित ही पत्रिका काढण्यामागे गांधीवादी विचारसरणीला भ्रष्ट करण्याची सुनियोजित रणनीती असल्याची टीका केली आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी हा आरएसएसचा अजेंडा असल्याचा आरोप केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tushar gandhi objection to praise of savarkar in gandhi smriti pamphlet dpj
First published on: 19-07-2022 at 11:42 IST