देशातील प्रमूख वृत्तसंस्था ‘एशियन न्यूज इंटरनेशनल’ ( एएनआय ) चे ट्विटर खाते लॉक करण्यात आलं आहे. ट्विटरने ही कारवाई केली आहे. याबाबत ‘एएनआय’च्या संपादक स्मिता प्रकाश यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. ‘हे खातं अस्तित्वात नाही’ असं ट्विटरवर लिहिलं आहे.

स्मिता प्रकाश यांनी ट्विटरकडून आलेल्या मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहेत. त्यात म्हटलं की, “ट्विटर खाते बनवण्यासाठी तुमचं वय कमीत-कमी १३ वर्षे असलं पाहिजे. तुम्ही त्यासाठी पात्र ठरत नाही. त्यामुळे तुमचं खातं लॉक करण्यात आलं असून, ट्विटरवरून काढून टाकलण्यात आलं आहे.”

हेही वाचा : VIDEO : “मी पूर्णपणे निर्दोष, आरोपी बनून…”, गुन्हा दाखल झाल्यानंतर ब्रिजभूषण सिंह यांची प्रतिक्रिया

स्मिता प्रकाश ट्वीट करत म्हणाल्या की, “जे लोक ‘एएनआय’ला फॉलो करतात, त्यांच्यासाठी वाईट बातमी आहे. ट्विटरने भारताची सर्वात मोठी वृत्त कंपनी, जिचे ७.६ मिलियन फॉलोअर्स आहेत, ते खाते बंद केलं आहे. सोनेरी टिकच्याऐवजी, निळे टिक देण्यात आलं आहे. तसेच, खातं लॉक केलं आहे.”

हेही वाचा : VIDEO : “काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या, पण…”, पंतप्रधान मोदींचा कर्नाटकातून हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेचे देशात १०० ठिकाणी कार्यालये आहेत. ‘एएनआय’ ही संस्था रोज देश आणि विदेशात घडणाऱ्या घटनांची माहिती, फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. त्याच्या आधारावर अनेक माध्यमे वृत्त चालवत असतात.