विश्वचषक २०१९ च्या पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून गोलंदाजीची सुरुवात भुवनेश्वर कुमारने केली. पहिल्याच चेंडूवर भारताना डीआरएस गमावला. त्यानंतरही भुवनेश्वरने सुरेख गोलंदाजी करत पहिल्या षटकात मार्टिन गप्टिलला एकही धाव घेऊ दिली नाही. हाच कारनामा दुसऱ्या षटकामध्ये जसप्रीत बुमराहने करुन दाखवला. त्याने हेन्री निकोल्सला निर्धाव षटक टाकले. पहिली दोन षटके निर्धाव टाकत न्यूझीलंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी जखडून ठेवलं. दोन षटकानंतर न्यूझीलंडचा धावफलकावरील भोपळा फुटला नव्हता. अखेर तिसऱ्या षटकामध्ये न्यूझीलंडला पहिली धाव घेता आली. भुवनेश्वर आणि बुमराहच्या सुरेख गोलंदाजीमुळे पाच षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या अवघी पाच धावा इतकी होती आणि त्यांचा एक गडी तंबूत परतला होता.
भारताच्या याच भन्नाट गोलंदाजीवर नेटकरी खूप खूष झाले असून अनेकांनी भुवनेश्वर-बुमराह जोडीला समाल करण्यासाठी आणि न्यूझीलंडच्या संघाची फिरकी घेणारे मिम्स ट्विटवर पोस्ट केले आहेत. यामध्ये अगदी इंग्लंडची राणी कोहिनूर हिऱ्याच्या मोबदल्यात बुमराह देण्याची मागणी करत असल्यापासून ते एक धाव काढल्यावर न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल खिचडी कार्यक्रमातल्या हंसाप्रमाणे ‘ए मे तो थक गई भाईसाहाब’ म्हणेपर्यंचे मिम्स व्हायरल केले आहेत. बुमराहच्या गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या खेळांडूचा टिकाव लागणार नाही हे सांगण्यासाठी बुमराह गोलंदाजीला आल्यावर न्यूझीलंडच्या फलंदाजांची स्थिती दाखवताना सिक्रेड गेम्समधील गायतोंडेच्या मिम्सचा वापर करत ‘मैं नही बचेगा इधर, मर जाऐगा मै’ असं फलंदाज म्हणत असतील असही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. पाहुयात व्हायरल झालेले मिम्स…
दोन ओव्हरनंतर पहिली धाव काढल्यावर
guptill after scoring the first run#INDvNZ pic.twitter.com/VrjI0qQK8v
— Arun LoL (@dhaikilokatweet) July 9, 2019
आज इंग्लंड ५०० च्या मूडमध्ये आहे
1st Over: Maiden
2nd Over: Maiden
3rd Over: 1 Run
4th Over: 1 Run and a wicket.Aj to NZ bhi 500 k mood me hai #NZvIND #INDvNZ
— Saad (@iSaadAwais22) July 9, 2019
अशी बॅट द्या त्यांना
bat new Zealand players want right now; 2 over maiden#indvnz #CWC19 pic.twitter.com/nkKVGoUcTM
— d J (@djaywalebabu) July 9, 2019
गप्टिल एका धावेनंतर
Guptil after scoring 1 run…#indiavsNewzealand #INDvNZ pic.twitter.com/szIuieAB66
— Sharad Kotriwala (@ModijiKaHathHai) July 9, 2019
बुमराहला असं खेळा
The only way batsmen can play bumrah is this stance #INDvNZ pic.twitter.com/mcQEcL0EKv
— Zaheer Jussab (@zaheerjsb) July 9, 2019
बुमराह विकेट कशा घेतो
#INDvNZ
Bumrah to wickets in this world cup: pic.twitter.com/JQREmO8Q7b— ZOE (@ExcuseMe_Zoe) July 9, 2019
बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करताना न्यूझीलंडचे फलंदाज
NZ batsman while facing Jasprit Bumrah. #INDvNZ pic.twitter.com/vv8o0CL0vZ
— R A T N I $ H (@LoyalSachinFan) July 9, 2019
कोहिनूर घ्या बुमराह द्या
That’s bumrah for you
#INDvNZ pic.twitter.com/riEX2TiAjJ— Mr. Bakchod (@Batrajikalonda) July 9, 2019
येणार ना… घाबरणार तर नाही ना
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.Bumrah to the NZ batsmen waiting in the dressing room pic.twitter.com/vpLOA57eTe
— Sir Yuzvendra (parody) (@SirYuzvendra) July 9, 2019
बलिदान द्यावं लागेल
Bumrah to Guptill #INDvNZ #indiavsNewzealand #CWC19 pic.twitter.com/BY5S2ruyiy
— The Viral Fever (@TheViralFever) July 9, 2019
दरम्यान उपांत्य फेरीचा दुसरा सामना ११ जुलै रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यान होणार आहे. त्यामुळेच आजचा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंडशी लढेल.