महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. ट्विटरवर महिंद्रा यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. प्रेरणादायी पोस्ट शेअर करण्यापलीकडे ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही ते विचारपूर्वक देतात. एका ट्विटर युजरने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे. तुम्ही भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कधी होणार? असा प्रश्न महिंद्रा यांना एका ट्विटर युजरने विचारला. भारतातील श्रीमंतांच्या यादीत तुमचा ७३ वा क्रमांक आहे, तुम्ही प्रथम क्रमांकावर कधी पोहोचणार? या प्रश्नाचं उत्तर महिंद्रा यांनी त्यांच्या स्टाईलने दिलं आहे.

ट्विटर युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना आनंद महिंद्रा म्हणाले…

तुम्ही भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कधी होणार? ट्विटर युजरच्या या प्रश्नाला उत्तर देताना महिंद्रा म्हणाले, “मी सर्वात श्रीमंत कधीच होणार नाही, हे सत्य आहे. कारण माझी अशाप्रकारची इच्छा कधीच नव्हती.” महिंद्रा यांच्या या ट्विटनं हजारो सोशल मीडिया युजर्सची मनं जिंकली आहेत. त्यांनी केलेल्या या ट्विटर पोस्टला १६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच असंख्य प्रतिक्रियांचा वर्षावही झाला आहे. महिंद्रा यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटलं, “गरूड नेहमी ढगांच्या वर उडतो. ज्यांना बाहेरील प्रमाणीकरणाची गरज आहे, त्यांना नंबरची आवश्यकता आहे. तुम्हाला नक्कीच या गोष्टींची गरज नाही. जे तुम्ही पेरलं आहे, त्याचा फायदा भारतातील अनेकांना श्रीमंत होण्यासाठी होईल”.

नक्की वाचा – Video: हाथी मेरे साथी! हत्तीने घेतली पप्पी, व्हायरल व्हिडीओनं लाखो नेटकऱ्यांची मनं जिंकली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसंच अन्य एक युजर म्हणाला, “मोठ्या मनाची माणसं नेहमी आपल्या भारत देशाचा विचार करतात आणि देशासाठी काय योगदान देता येईल, असाही विचार ते करत असतात.” तर दुसऱ्या एका युजरने म्हटलं, आम्ही तुमची आणि रतन टाटा यांची नेहमी प्रशंसा करतो. त्यामागे अनेक कारणं आहेत.भरपूर आयुष्य जगा आणि सुरक्षित राहा.” दरम्यान, आनंद महिंद्रा नेहमीच समाजोपयोगी आणि प्रेरणादायी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांनी केलेल्या पोस्टवर हजारो नेटकरी लक्ष वेधतात आणि त्यांना प्रश्नही विचारतात.