दिल्लीत एका अल्पवयीन मुलाला चाकूने वार केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. १७ वर्षीय अल्पवयी मुलाने दारूसाठी ५० रुपये न दिल्याबद्दल त्याच्या दोन मित्रांवर चाकूने वार केला. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला पकडले आहे. या घटनेनंतर इतर दोन आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेत जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
A 17-year-old boy apprehended in Delhi for allegedly stabbing his two friends after they refused to give him Rs 50 for alcohol. Two other accused are absconding. The injured people are admitted in hospital.
— ANI (@ANI) July 30, 2021
आणखी एका घटनेत, उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातील थाना एक्सप्रेस वे परिसरात एका महिलेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
पार्सलला पाय लागल्याच्या भांडणातून डिलेव्हरी बॉयला बेदम मारहाण
मुंबई पोलिसांनी मंगळवारी कांदिवलीमधील शिवसेनेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवसेनेच्या शाखाप्रमुखाचाही समावेश आहे. या पाच जणांनी पोईसर येथे एका डिलेव्हरी बॉयला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोनजण अद्याप फरार असल्याचं सांगण्यात आलं आहे.