लेह: पूर्व लडाखमधील दुर्गम भागात लष्कराच्या वाहनावर दरड कोसळल्याने एका लेफ्टनंट कर्नलसह दोन सैनिकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तीन अधिकारी जखमी झाले.
येथून दोनशे किमी अंतरावर गलवानमधील दुरबुकजवळ चारबाग येथे हा अपघात झाला. लेफ्टनंट कर्नल भानु प्रताप सिंह मनकोटिया व लान्स दफदार दलजीत सिंह यांचा यामध्ये मृत्यू झाला. मेजर मयंक शुभम, मेजर अमित दीक्षित तसेच कॅप्टन गौरव हे जखमी झाले.
जवानांना घेऊन जाणारा वाहनांचा ताफा दुरबुक येथून चोंगष्टकडे जात होता. लष्कराच्या नॉर्दन कमांडने आपल्या शोकसंदेशात बहादूर जवानांनी सेवेत असताना सर्वोच्च बलिदान दिल्याचे नमूद केले.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.