श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्यासह दोन दहशतवादी ठार झाले. दक्षिण काश्मीरमधील कुलगामच्या चेयान देवसर भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली. या वेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यात हैदर नावाच्या पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. बंदीपुरा येथे अलीकडेच झालेल्या दोन दहशतवादी गुन्ह्यांत तो सहभागी होता. चकमकीत ठार झालेला शाहबाझ शाह नावाचा दुसरा दहशतवादी कुलगाम येथील होता. १३ एप्रिल रोजी सतीश कुमार सिंह या नागरिकाच्या हत्येत त्याचा सहभाग होता.
संग्रहित लेख, दिनांक 9th May 2022 रोजी प्रकाशित
काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
दक्षिण काश्मीरमधील कुलगामच्या चेयान देवसर भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली

First published on: 09-05-2022 at 05:41 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two militants killed in kashmir after clashes with security forces zws