उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुंडाने अमानुष वागणूक दिली आहे. आरोपीनं पीडित मुलांना जबरदस्तीने लघवी पिण्यास भाग पाडलं आहे. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चोरीच्या संशयातून अल्पवयीन मुलांना ही शिक्षा दिल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

एवढंच नव्हे आरोपीनं क्रूरतेच्या परिसीमा गाठत पीडित मुलांना एका अज्ञात ड्रग्जचं इंजेक्शनही टोचलं आहे. तसेच हिरवी मिरची वापरून त्यांच्याबरोबर अघोरी कृत्य केलं आहे. या अमानुष घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. आरोपीकडून मुलांना मारहाण होत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. पीडित मुलं १५ आणि १० वयोगटातील आहेत.

हेही वाचा- पुणे स्टेशन परिसरातील गुंड टोळीवर मोक्का कारवाई, आतापर्यंत शहरातील ४४ टोळ्यांना मोक्का लागू

‘इंडिया टुडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपीनं अल्पवयीन मुलांच्या गुप्तांगात हिरवी मिरची टाकल्यानंतर त्यांना जबरदस्तीने लघवी पिण्यास भाग पाडलं आहे. पाथरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंकटी चौक परिसरात हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे.

हेही वाचा – VIDEO: पाकिस्तानात एक्स्प्रेस रेल्वेला भीषण अपघात; २५ जणांचा मृत्यू, ८० जण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सिद्धार्थनगरच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकांनी (एएसपी) या घटनेची पुष्टी केली. पोलिसांनी या विकृत घटनेत सहभागी असलेल्या सहा संशयितांची ओळख पटवली असून त्यांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.