लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा गुरूवारी खात्मा करण्यात आला. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील डंगेरपोरा गावात ही चकमक झाली. यादरम्यान जवानांनी या दोन्ही अतिरेक्यांना घेरले होते, मात्र त्यांच्याकडून गोळीबार करण्यात आल्याने जवानांकडून झालेल्या प्रतिहल्ल्यात ते दोघेही ठार झाले.
#UPDATE: Two terrorists neutralised in an encounter in Danger Pora area of Sopore in Baramulla. #JammuandKashmir https://t.co/LnjydwqIfM
— ANI (@ANI) May 30, 2019
भारतीय सैन्याच्या २२ आर आर संयुक्त पथक,जम्मू – काश्मीर पोलिसांचे विशेष मोहिम पथक व सीआरपीएफच्या तुकडीने ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान परिसरातील शाळा, महाविद्यालयांसह इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.
या अगोदर जम्मू- काश्मीरमध्ये जवानांनी झाकिर मुसा या भयानक दहशतावाद्याचा खात्मा करण्यात यश मिळवले होते. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जवानांनी मोठी चकमक व भीषण गोळीबारानंतर हिज्बुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडव सध्याचा जम्मू-काश्मीर आयएस कमांडर दहशतवादी झाकिर मूसाचा खात्मा केला होता.