दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेल्या उमर खालीदचे वडील सय्यद कासिम रसूल यांनी आपल्याला धमकीचा फोन आल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. कुख्यात गँगस्टर रवी पुजारीने काल आपल्याला दूरध्वनीवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. तुमच्या मुलाने देश सोडला नाही, तर त्याला ठार मारु, अशी धमकी देण्यात आल्याचे सईद यांनी सांगितले.
‘जेएनयू’मध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या सभेवेळी भारतविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया कुमार सध्या अटकेत आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, या सभेमध्ये देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांमागे कन्हैया कुमार नसून उमर खालिदने या घोषणा दिल्याची चर्चा आहे. सध्या पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहे. त्यामुळे उमर खालिदवरही देशद्रोहाचा खटला दाखल होण्याची शक्यता आहे.
मात्र, माझ्या मुलावर चुकीचे आरोप करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण सईद कासीम रसूल यांनी यापूर्वीच दिले होते. आता त्यांनी आपल्याला धमकीचा फोन आल्याची तक्रार दाखल केली आहे. तुमच्या मुलाने देश सोडला नाही, तर त्याला ठार मारु, अशी धमकी देण्यात आल्याचे सईद यांनी सांगितले. उमरच्या वडीलांनी कुटुंबासाठी पोलिस संरक्षणाचीही मागणी केली आहे. उमरच्या छोट्या बहिणीलाही सोशल मिडीयातून धमक्या देण्यात येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umar khalid father syed qasim rasool ilyas claims to have been given a death threat by ravi pujari
First published on: 20-02-2016 at 12:33 IST