आपली झडती घेण्यात येत नसल्यामुळे विमान प्रवासात आपण आपल्यासमवेत काडेपेटय़ाही नेऊन नियमभंग करीत असल्याची स्पष्ट कबुली नागरी हवाई उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी मंगळवारी दिली. राजू हे ‘चेन स्मोकर’ म्हणून त्यांच्या वर्तुळात प्रसिद्ध आहेत. हवाई व्यवस्थेबद्दल देशभरात चिंता व्यक्त होत असतानाच राजू यांच्या या वक्तव्यांचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नागरी हवाई सुरक्षा विभागाच्या (ब्युरो ऑफ सिव्हिल अॅव्हिएशन सिक्युरिटी) एका सभेत राजू बोलत होते. मंत्री होण्याअगोदर गेल्या वर्षांपर्यंत आपण विमानातून काडेपेटय़ा वा लायटर नेत असताना विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांनी ते अनेक वेळा जप्त केले. परंतु मंत्री झाल्यावर आपली झडती घेणे थांबले आणि त्यामुळे माझ्या काडेपेटय़ा, लायटर आता बरोबर नेता येतात, असे राजू यांनी मोठय़ा आढय़तेने सांगितले. विमानातून काडेपेटय़ा वा लायटर नेण्यास अनुमती दिली जावी का, असे विचारले असता, त्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही, परंतु माझ्याजवळ मात्र ही सगळी सामुग्री असते, असे त्यांनी सांगितले. आताही माझ्या खिशात काडेपेटी आहेच, असे ते म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2015 रोजी प्रकाशित
नागरी उड्डयनमंत्र्यांकडूनच नियमभंग
आपली झडती घेण्यात येत नसल्यामुळे विमान प्रवासात आपण आपल्यासमवेत काडेपेटय़ाही नेऊन नियमभंग करीत असल्याची स्पष्ट कबुली नागरी हवाई उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी मंगळवारी दिली.
First published on: 08-04-2015 at 12:04 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unfortunate that aviation minister is violating safety laws