केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी काहीसा दिलासादायक निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केंद्रान ४ चार टक्क्यांची वाढ केली आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली. देशासमोर उद्भवलेल्या आर्थिक आणि करोनाच्या संकटावर मात करण्याबद्दल चर्चा झाली. यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयाला मंजुरी देण्यात आली.

गेल्या वर्षी पाच टक्के वाढ

यापूर्वी ऑक्टोबर २०१९ मध्ये सरकारनं महागाई भत्त्यात वाढ केली होती. केंद्रानं त्यावेळी महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली होती. या निर्णयामुळे ५० लाख वेतनधारक कर्मचारी आणि ६२ पेन्शनधारकाना लाभ झाला. तर तब्बल १६ हजार कोटी रूपयांचा बोजा सरकारी तिजोरीवर पडला होता.  चार टक्के वाढ करण्यात आल्यामुळे भत्ता २१ टक्के झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Union cabinet approves 4 increase in da for central government employees bmh