आंध्रप्रदेश राज्याचे विभाजन करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून केंद्रिय मंत्रिमंडळाने स्वतंत्र तेलंगण राज्यास मंजुरी दिली आहे. तसेच येती दहा वर्षे हैदराबाद हीच आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांची संयुक्त राजधानी राहिल असेही मंत्रिमंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच राज्य निर्मितीनंतर त्याच्या सर्व व्यवस्था पहाणे आणि आवश्यक बाबींची पूर्तता करणे यासाठी एका मंत्रीगटाची स्थापनाही करण्यात आली आहे.केंद्रिय मंत्रिमंडळाने गुरूवारी स्वतंत्र तेलंगणा राज्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तो आंध्र प्रदेश राज्याच्या विधानसभेकडे पाठविण्यात येणार असून तेलंगणा हे भारतातील २९ वे राज्य असेल. ३० जुलै रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत केंद्राने स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी आवश्यक ती पावले उचलावीत असा ठराव केला होता. मात्र अजूनही आंध्र प्रदेशचे विभाजन होऊ नये अशी अनेकांची इच्छा असून त्यांच्याकडून या निर्णयाचा निषेध केला जात आहे.
* श्रीरामुलुंची मुक्ती
* स्वतंत्र तेलंगणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब