उत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये महापालिका निवडणुकांचा प्रचार जोशात केला जातो आहे. सगळेच राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारचे फंडे आजमवाताना दिसत आहेत. अशात वॉर्ड ३० मधल्या एका अपक्ष उमेदवाराने रिटर्निंग ऑफिसरला लिहिलेलं पत्र व्हायरल होतं आहे. निवडणूक आयोगाकडे या उमेदवाराने रशियन मुलींच्या नाचाची संमती मागितली आहे तसंच लोकांना मद्यपान करण्याची संमती द्यावी असंही म्हटलं आहे.

या अपक्ष उमदेवाराने लिहिलेलं पत्र व्हायरल झालं आहे. या दरम्यान एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे ज्यामध्ये रशियन मुलगी नाचताना दिसते आहे. एस.पी. ब्रजनारायण सिंह यांनी या प्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. वॉर्ड ३० चे अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट संजय दुबे हे निवडणूक लढवत आहेत. यांनीच हे पत्र लिहिलं आहे. या पत्रात असंही लिहिलं आहे की डान्सर २० वर्षांची असावी आणि या कार्यक्रमात लोकांना मद्य वाटण्याची संमती द्यावी. अपक्ष उमेदवार संजय दुबे यांचं प्रचार चिन्ह पेन्सील आहे.

रशियन डान्स ठेवण्याची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंबेडकर नगरचे अपक्ष उमेदवार संजय दुबे यांनी या संदर्भात कॅमेरासमोर काही बोलणं टाळलं आहे. हे पत्र मात्र २ दिवसांपासून व्हायरल होतं आहे. या प्रकरणी आता चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस हे प्रकरण गांभीर्याने तपासत आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.