क्रूरपणाचा कळस! आधी फसवून लग्न, मग धर्मांतरासाठी बळजबरी आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लखनौमधली घटना, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Rape
आरोपीने या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. (संग्रहित छायाचित्र)

उत्तरप्रदेशातल्या लखनौमध्ये एका व्यक्तीने आपला धर्म आणि खरी ओळख लपवून एका महिलेशी लग्न केलं. लग्नानंतर त्याने तिला धर्मांतर करण्याची बळजबरी केली. तसंच या व्यक्तीने महिलेल्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या महिलेने घडलेल्या प्रकाराबद्दल पोलिसांकडे धाव घेतली, तेव्हा ही घटना प्रकाशझोतात आली.

गुदांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गावामध्ये ही ३५ वर्षीय महिला राहत होती. तिने कानपूरच्या इमरान खान नावाच्या एका व्यक्तीबद्दल तक्रार केली. तिचा असा आरोप होता की, इमरानने आपल्याला त्याचं नाव संजय चौहान आहे असं सांगितलं आणि लग्न केलं.

हेही वाचा- खासदारांच्या बनावट शिफारसपत्राच्या मदतीने Confirm करायचे रेल्वे तिकीट; अशी झाली भांडाफोड

फिर्यादी महिला ही घटस्फोटीत आहे. तिला तिच्या पहिल्या पतीपासून एक लहान मुलगीही आहे. इमरानसोबत लग्न झाल्यानंतर काही दिवसांनीच त्याने आपल्याला धर्मांतरासाठी बळजबरी करण्यास सुरुवात केली असा आरोप या महिलेने केला आहे. जेव्हा या महिलेने धर्मांतराला विरोध केला, तेव्हा इमरानने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. तसंच तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कारही केला.

पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे आणि आरोपीला या प्रकरणात अटकही करण्यात आली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी अनेक बनावट ओळखपत्रं आणि मतदान ओळखपत्रेही जप्त केली आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Up man marries woman after faking identity forces her to convert rapes daughter vsk

ताज्या बातम्या