सध्या देशभरामध्ये ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची तुफान चर्चा आहे. राजकीय वादाबरोबरच या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद आणि कमाईचे आकडेही सतत बातम्यांचा विषय ठरत आहेत. या चित्रपटावरुन रोज काही ना काही वक्तव्य आणि दावे केले जात आहेत. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. अशातच दिल्लीमध्येही भाजपाने हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली होती. त्या मागणीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“भाजपा सर्वात मोठा पक्ष असला तरी…”; अरविंद केजरीवाल यांनी उडवली खिल्ली

गुरुवारी दिल्ली विधानसभेदरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाइल्सच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाची खिल्ली उडवली. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी दिल्ली विधानसभेत केजरीवाल यांनी विवेक अग्निहोत्रीच्या द काश्मीर फाइल्सला अनेक राज्यांमध्ये करमुक्त केल्याबद्दल भाजपाची खिल्ली उडवली. तसेच केजरीवाल यांनी भाजपाला सुचवले की चित्रपट टॅक्स फ्री करण्यापेक्षा त्यांनी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीला हा चित्रपट YouTube वर अपलोड करण्यास सांगावे. कारण तिथे प्रत्येकजण तो चित्रपट फ्री पाहू शकतील, असंही ते म्हणाले.

“…तर आम आदमी पार्टी राजकारण सोडेल;” अरविंद केजरीवाल यांचं भाजपाला आव्हान

आठ वर्षे देशावर राज्य करूनही भाजपाला राजकीय फायद्यासाठी चित्रपटाची मदत घ्यावी लागत असल्याचा आरोप करत केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडले. काही लोक काश्मिरी पंडितांच्या नावावर कोट्यवधींची कमाई करत आहेत आणि तुम्ही चित्रपटाचे पोस्टर लावत फिरत आहात, असं म्हणत त्यांनी भाजपाला टोला लगावला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upload the kashmir files on youtube kejriwal to bjp mlas seeking movie be made tax free hrc
First published on: 24-03-2022 at 20:04 IST