उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने उद्या ४० खेडय़ांची महापंचायत बोलावली असून त्यात महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे याचे मंदिर उभारण्याचा निषेध केला जाणार आहे.
महापंचायत ही येथून २० कि.मी अंतरावर असलेल्या रोहटा येथे घेण्यात येणार असून उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमित जानी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, गोडसे याच्या मंदिराला विरोध करणाऱ्या सर्वाना महापंचायतीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अलीकडेच अखिल भारतीय हिंदू महासभेने गोडसे याच्या मंदिराची भूमिपूजन केले असून त्यानंतर प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत.जानी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश नवनिर्माण सेनेने शारदा रोड येथील अखिल भारतीय हिंदूू महासभेच्या कार्यालयासमोर अहिंसक निदर्शने करण्याचे ठरवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upns to hold mahapanchayat against nathuram godse temple
First published on: 04-01-2015 at 06:47 IST