अमेरिकन वायूसेनेचं एफ-३५ हे लढाऊ विमान गेल्या २४ तासांपासून बेपत्ता आहे. या विमानाचा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातानंतर विमानाच्या पायलटने पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली. पायलट हा सुरक्षित जमिनीवर उतरला असून विमान मात्र बेपत्ता आहे. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार दक्षिण कॅरोलिनामध्ये बेपत्ता झालेल्या या लढाऊ विमानाचा शोध घेतला जात आहे. यासाठी अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांनी स्थानिकांची मदत घेतली आहे. तसेच या भागात विमान कोसळ्याचं कोणी पाहिलं आहे का? अशी विचारणाही लष्करी अधिकारी स्थानिकांकडे करत आहेत.

दरम्यान, अमेरिकन लष्कराने सांगितलं की रविवारी (१७ सप्टेंबर) दुपारी २ च्या सुमारास उत्तरेकडील चार्ल्सटन डोंगरावर एक मरीन कॉर्प्स पायलट पॅराशूटच्या मदतीने उतरला. हा पायलट एफ-३५ बी लायटनिंग II जेटमधून उडी मारून पॅराशूटच्या मदतीने खाली आला. अमेरिकन लष्कर आणि वायूसेना या विमानाचा शोध घेत आहे.

या पायलटला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं असून, डॉक्टरांनी सांगितलं की पायलटची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी या घटनेची तपशीलवार माहिती देणं टाळलं. मेजर मेलानी सेलिनास म्हणाल्या, पायलट दुपारी २ च्या सुमारास चार्ल्सटनवर उतरला. तर सार्जंट हीथर स्टँटन म्हणाले पायलट ज्या ठिकाणी उतरला त्या भागात आम्ही बेपत्ता विमानाचा शोध घेत आहोत. मोल्ट्री आणि मॅरियन तलावाच्या आसपास F-35 Lightning II जेटचा शोध घेतला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे ही वाचा >> “…तर पुढच्या चौकात यमराज त्याची वाट बघत असेल”, महिला सुरक्षेवरून योगी आदित्यनाथ आक्रमक

दरम्यान, खरंच अपघात झाला होता का? पायलट विमानातून बाहेर का पडला? याबाबत वायूदलाचे अधिकारी तपास करत आहेत. जिथे पायलट उतरला त्या भागात सध्या खराब हवामान आहे. त्यामुळे दक्षिण कॅरोलिनामधील हवामान साफ झाल्यानंतर वायूदल विमानाचा शोध घेईल.