सध्या संपूर्ण जगाचं लक्ष अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीकडे लागलं आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव होऊन डेमोक्रॅटिकचे उमेदवार जो बायडेन यांचा विजय होण्याची शक्यता आहे. दरम्यान संपूर्ण जगाचं लक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि बायडेन यांच्याकडे असताना मराठी माणसाने जबरदस्त कामगिरी करत सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. श्री ठाणेदार यांनी मिशिगन राज्यातून विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे.

‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’साठी झालेल्या निवडणुकीत भारतीय वंशाचे उमेदवार श्री ठाणेदार यांनी आमदारकी मिळवली आहे. श्री ठाणेदार यांनी तब्बल ९३ टक्के मतं खिशात घालत ‘रिपब्लिकन पक्षा’च्या उमेदवाराचा पराभव केला आहे. श्री ठाणेदार यांचा २५ हजार मतांनी विजय झाला असून प्रतिस्पर्धी उमेदवाराला फक्त सहा टक्के मतं मिळाली.

Iran Israel conflict wrong us policy worsening the west asia situation
अन्वयार्थ : अमेरिकेच्या चुकांची परिणती
Rahul Gandhi Attacks PM Modi
मोदींना फक्त श्रीमंतांची चिंता; राहुल गांधी यांचा आरोप
Kerala women in voting
मतदानात महिला पुढे; मग उमेदवारीत मागे का? महिलांना उमेदवारी देण्यात केरळमधील राजकीय पक्षांच्या उदासीनतेचे कारण काय?
Loksabha elections 2024 Ignorance of farmers' issues
विश्लेषण: सत्ताधारी आणि विरोधकांची शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाठ; ‘वातावरण बदला’वर मौन; नेमके काय घडत आहे?

श्री ठाणेदार यांनी दोन वर्षांपूर्वी २०१८ मध्ये राज्याच्या गव्हर्नरपदासाठी निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी दोन लाखांहून अधिक मतं मिळाली होती. “श्री फॉर व्ही” ही त्यांची प्रचारमोहीम चांगलीच गाजली होती.

श्री ठाणेदार मिशिगन यांनी राज्यातून यावर्षी ‘हाऊस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह’ म्हणजेच विधानसभेची निवडणूक लढवली. त्यांचं एक यशस्वी उद्योजक – ‘ही श्रीची इच्छा’ प्रसिध्द आत्मचरित्र आहे. आजपर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाचे मोठे देणगीदार असलेले श्री ठाणेदार आता पक्षाचे लोकनियुक्त प्रतिनिधी झाले आहेत.

श्री ठाणेदार हे मूळचे बेळगावचे आहेत. रसायनशास्त्रात त्यांनी पदवी मिळवली आहे. तर मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. नंतर पुढील शिक्षणासाठी १९७९ मध्ये ते अमेरिकेला स्थायिक झाले. त्यावेळी त्यांचं वय २४ होतं. श्री ठाणेदार यांचं “ही ‘श्री’ ची इच्छा” आत्मचरित्र असून यामध्ये त्यांनी आपला संपूर्ण प्रवास उलगडलेला आहे.

श्री ठाणेदार यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, “करोना संकटात आपण प्रचाराला सुरुवात केली होती. यावेळी बराच वेळ मास्क, हॅण्ड सॅनिटायजरचं वाटप करण्यात आपण घालवला. शिक्षण, रस्ते, उद्योगांवर काम करणार आहे. राज्यातील अनेक समस्या आपण सोडवणार असून गरिबीच्या वेदना काय असतात हे मी समजू शकतो”.