अचानकपणे निर्माण झाल्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे अमेरिकेतील हवाई वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. येथे तब्बल ५४०० हून अधिक विमानांचे उशिराने उड्डाण होत आहे. विमान वाहतूक सेवेच्या नोटीस टू एअर मिशन सिस्टिममध्ये निर्माण झालेल्या बिघाडामुळे येथे सर्व विमानांची उड्डाणं काही काळासाठी थांबवण्यात आली होती. आता हवाई वाहतूक सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय घडलं होतं?

हवाई वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी NOTAM ही ऑपरेटिंग सिस्टिम फार महत्त्वाची असते. या प्रणालीच्या माध्यमातून पायलटला हवामान तसेच इतर महत्वाची माहिती दिली जाते. तसेच NOTAM मधून रिअल टाईम डेटा गोळा करुन विमानतळ ऑपरेशन्स आणि एअर ट्राफिक कंट्रोलला (ATC) अचूक माहिती पुरविली जाते. मात्र ही यंत्रणाच ठप्प पडल्यामुळे सर्व विमान उड्डाणं थांबवण्यात आली होती.

हेही वाचा >> पंकजा मुंडेंनी घेतली धनंजय मुंडेंची भेट, रुग्णालयात जाऊन केली प्रकृतीची विचारपूस

दरम्यान या तांत्रिक बिघाडानंतर प्रवाशांनी समाजमाध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा मोठा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे व्हाइट हाऊसनेही यावर प्रतिक्रिया दिली. ‘दळणवळण विभागाचे सचिव काही वेळापूर्वीच राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना भेटले आहेत. अचानक उद्भवलेल्या या संकटाबाबत त्यांनी अध्यक्षांना अवगत केलं आहे. आतापर्यंत जो काही तपास झाला त्यावरुन हा सायबर हल्ला नसल्याचे आमच्या लक्षात आले आहे,’ अशी प्रतिक्रिया व्हाईट हाऊसचे जनसंपर्क सचिव कैरीन जीन पियरे यांनी दिली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us flights delayed in massive technical glitch now system starting slowly prd
First published on: 11-01-2023 at 23:19 IST