US Visa Interviews : परदेशी विद्यार्थी व्हिसासाठी नवीन मुलाखती न घेण्याचे आदेश ट्रम्प प्रशासनाने जगभरातील अमेरिकन दूतावासांना देण्यात आले आहे. द गार्डियन यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. सरकार सर्व विद्यार्थी आणि एक्सचेंज अभ्यागत व्हिसा अर्जदारांसाठी सोशल मीडिया तपासणी वाढवण्याची योजना आखत असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे.
मंगळवारी पाठवलेल्या परराष्ट्र विभागाच्या संदेशात म्हटले आहे, “पुढील आदेश येईपर्यंत कॉन्सुलर विभागांनी कोणताही अतिरिक्त विद्यार्थी किंवा एक्सचेंज अभ्यागत (एफ, एम आणि जे) व्हिसा अपॉइंटमेंट क्षमता वाढवू नये.” ही सूचना विद्यार्थी आणि एक्सचेंज व्हिसांना लागू होते. या व्हिसाची अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी अनेक परदेशी विद्यार्थ्यांना आवश्यकता असते.
या विलंबामुळे व्हिसा प्रक्रियेत बराच विलंब होऊ शकतो आणि उत्पन्नासाठी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर अवलंबून असलेल्या विद्यापीठांवर परिणाम होऊ शकतो. गेल्या वर्षी दहा लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत होते, यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सुमारे $४३.८ अब्ज योगदान दिले आहे, असे NAFSA असोसिएशनने म्हटले आहे.
सोशल मीडियाची खाती तपासणार
ट्रम्प प्रशासन विद्यार्थी व्हिसासाठीचे नियम कडक करण्याचा विचार करत असताना हे नवीन धोरण आले आहे. सरकारचे म्हणणे आहे की ते सर्व विद्यार्थी व्हिसा अर्जदारांसाठी सोशल मीडिया तपासणी वाढवण्यात येणार आहेत. कॉन्सुलर अधिकारी इंस्टाग्राम, टिकटॉक आणि एक्स सारख्या प्लॅटफॉर्मवरील पोस्ट, लाईक्स, कमेंट्स आणि शेअर्स पाहिले जाणार आहेत. यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे दिसत असलेल्या कोणत्याही कंटेंटची चिन्हे तपासता येणार आहेत.
मार्चपासून, कॉन्सुलर अधिकारी पॅलेस्टिनी समर्थक निदर्शनांमध्ये सामील झालेल्या विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियाची तपासणी करत आहेत. हा व्यापक विस्तार सर्व विद्यार्थी व्हिसा अर्जदारांना लागू होईल. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही विद्यापीठांवर अति-डाव्या विचारांना प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे आणि त्यांच्या प्रशासनाने नवीन व्हिसा तपासणीचा संबंध यहूदी-विरोधीतेशी लढण्याच्या प्रयत्नांशी जोडला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की हजारो विद्यार्थी व्हिसा आधीच रद्द करण्यात आले आहेत. “मला नवीन आकडेवारी माहित नाही, परंतु आपल्याला कदाचित बरेच काही करायचे आहे”, असे त्यांनी सिनेटरना सांगितले. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच व्हिसा मुलाखती स्थगित करण्यात आल्या आहेत, यामुळे अनेक विद्यार्थी वेळेवर अमेरिकेत पोहोचू शकणार नाहीत अशी चिंता निर्माण झाली आहे. देशभरातील विद्यापीठे इशारा देत आहेत की याचा परिणाम केवळ विद्यार्थ्यांवरच नाही तर संशोधन, अध्यापन आणि निधीवरही होऊ शकतो.