युक्रेनवरील आक्रमणात वापरण्यासाठी रशियाने चीनकडे लष्करी सामग्रीची मागणी केली असल्याचे अमेरिकेच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने म्हटल्यानंतर काही तासांमध्ये अमेरिकेने एक फार मोठा निर्णय घेतला आहे. रशियाने चीनकडे लष्करी मदत मागितल्यामुळे अमेरिका व चीन सरकारांच्या उच्चपदस्थ सहकाऱ्यांमध्ये रोममध्ये होऊ घातलेल्या बैठकीपूर्वी सध्या सुरू असलेल्या युद्धाबाबतचा तणाव वाढत असतानाच आता अमेरिकेने युक्रेनच्या बाजूने युद्धात उतरण्याचा निर्णय घेतलाय.

नक्की पाहा >> Photos: युक्रेनमध्ये शिरलेल्या रशियन तोफा, गाड्यांवर Z, O, X, V अक्षरं का लिहिली आहेत? त्यांचा अर्थ काय?

अमेरिका थेट युद्धाच्या मैदानात उतरणार नसली तर वेगवगेळ्या प्रकारच्या घोषणा अमेरिकेने केल्या असून या घोषणा म्हणजे युक्रेनसाठी मोठा दिलासा समजला जातोय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी काही आठवड्यांपूर्वीच बायडेन यांच्याशी चर्चा झाली तेव्हाच शस्त्र पुरवण्याची मागणी अमेरिकेकडे केली होती. २४ फेब्रुवारीपासून रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं असून जवळजवळ तीन आठवड्यानंतर अमेरिकेने थेट भूमिका घेत ही घोषणा केलीय.

israel iran tensions updates israel hits back at iran
पश्चिम आशियावर युद्धाचे ढग? इराणच्या इस्फान शहरावर इस्रायलचा ड्रोनहल्ला   
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
Iran attacks Israel four key questions
इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आता पुढे काय होणार? अमेरिकेची भूमिका काय?
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक

नक्की वाचा >> Ukraine War: “मी मेलो तरी…”; पाळीव बिबट्या, ब्लॅक पँथरला युक्रेनमध्ये सोडून येण्यास भारतीयाचा नकार

बायडेन यांनी नक्की काय घोषणा केली?
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केलीय. अमेरिकेने या युद्धामध्ये आता युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात बायडेन यांनी घोषणा केलीय. रशियाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिका आता युक्रेनला शस्त्रसाठी पुरवणार आहे असं बायडेन यांनी सांगितलं आहे. त्याचप्रमाणे अमेरिका आता युक्रेनमधून अमेरिकेत येणाऱ्या विस्थापितांनाही मदत करणार असून त्यांना देशात प्रवेश दिला जाईल असं अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलंय.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

“रशियाने केलेल्या हल्ल्यामध्ये संरक्षणासाठी युक्रेनकडे शस्त्र असतील याची आम्ही काळजी घेऊ. युक्रेनमधील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी आम्ही शस्त्र, पैसे आणि इतर मदत करणार आहोत. आम्ही युक्रेनमधील विस्थापितांनाही समावून घेणार आहोत,” असं बायडेन यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

लष्करी मदतीसोबतच ही मदतही करणार…
अमेरिकेने संपूर्ण ताकदीनिशी आता युक्रेनच्या मागे उभं राहण्याचा निर्णय घेतल्याचं चित्र सध्या दिसत आहे. लष्करी मदत म्हणजेच शस्त्र पुरवण्याबरोबरच अमेरिका युक्रेनला आर्थिक मदतही करणार आहे. आम्ही युक्रेनसाठी आर्थिक मदत तसेच अन्नधान्य, औषधं, पाणी आणि इतर माध्यमातून युद्धग्रस्त देशाला मदत करणार आहोत असं बायडेन म्हणालेत.

नक्की वाचा >> Ukraine War: “या गुलाबाच्या फुलाचं काय करु? त्यापेक्षा…”; युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्याची केंद्र सरकारवर टीका

किती मदत मागवली हे सांगितलं नाही…
चीनने रशियाला आर्थिक मदत देऊ करण्याची शक्यता हा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. युक्रेनमधील युद्ध सुरू ठेवण्यासाठी रशियाने चीनकडून लष्करी सामग्रीसह इतर मदत मिळण्याची अलीकडेच विनंती केली होती, असे अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने संवेदनशील माहितीवरील चर्चेच्या संबंधात नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. ही मदत किती प्रमाणावर मागण्यात आली याचा तपशील त्याने दिला नाही. याबाबतचे वृत्त आधी ‘दि फायनान्शिअल टाइम्स’ व ‘दि वॉिशग्टन पोस्ट’ने प्रकाशित केले होते.

नक्की वाचा >> Ukraine War: दोघांचं भांडण चीनचा लाभ! निर्यात भरमसाठ वाढली, आकडेवारी पाहून थक्क व्हाल

चीन आणि अमेरिकेत शाब्दिक बाचाबाची
रशियन अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या जागतिक निर्बंधांमुळे मिळणारी शिक्षा टाळण्यात रशियाला मदत करणे टाळावे, असा इशारा व्हाइट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांनी या बोलण्यापूर्वी चीनला दिला आहे.‘आम्ही चीनला असे करू देणार नाही,’ असे सुलिवान म्हणाले. यावर, अमेरिका ‘चुकीची माहिती’ पसरवत असल्याचा आरोप चीनने केला.

नक्की वाचा >> Ukraine War: २१ वर्षीय भारतीय विद्यार्थी युक्रेनच्या लष्करात झाला भरती; आई म्हणते, “पाच दिवसांपासून…”

युक्रेनवर रासायनिक आणि जैविक हल्ला?
रशियाच्या संबंधात चीन चुकीची माहिती पसरवत आहे, जेणेकरून रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या फौजांना युक्रेनवर रासायनिक किंवा जैविक शस्त्रांनी हल्ला करण्याचा बहाणा मिळेल, असाही आरोप बायडेन प्रशासनाने केला आहे.

नक्की वाचा >> Ukraine War: रशियन उद्योजकाने दिली पुतिन यांची साडेसात कोटींची सुपारी; म्हणाला, “जिवंत किंवा मृत पकडून…”

रशियाचा चीनला पाठिंबा…
रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणामुळे चीन अमेरिका व युरोपीय महासंघ या दोन सर्वात मोठय़ा व्यापारी भागीदारांच्या संबंधात अडचणीत आला आहे. चीनला या दोन्ही बाजारपेठांत प्रवेश हवा आहे, तरीही रशियासोबतची आपली मैत्री ‘अमर्याद’ असल्याचे सांगून त्याने रशियाला पाठिंबा दिला आहे.