Usha Vance on India Visit : अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी वान्स एप्रिलमध्ये सपत्नीक भारत भेटीस आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेतली. मोदींनीही त्यांना खास वेळ देत त्यांचं स्वतःहून आदरातिथ्य करत त्यांच्या मुलांबरोबर वेळ घालवला. या भेटीबाबत आता जे. डी. वान्स यांच्या पत्नी उषा वान्स यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आयुष्यभर लक्षात राहील असा हा भारत दौरा होता, असं उषा वान्स म्हणाल्या.

उषा वान्स म्हणाल्या, आयुष्यभर लक्षात राहील असा हा दौरा होता. माझी मुलं कधीच भारतात आली नव्हती. या देशातील कथा, खाद्याविषयी माझ्या मुलांनी फक्त ऐकलं हतं. पण त्यांनी प्रत्यक्षात काही अनुभवलं नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणं ही खास बाब होती. माझ्या मुलांनी त्यांना पाहिलं, त्यांनी पहिल्यांदा पांढऱ्या दाढीत आणि पांढऱ्या केसात भारतीय व्यक्ती पाहिला असेल. त्यामुळे त्यांनी तत्काळ त्यांना आजोबांचा दर्जा दिला.

वैयक्तिक संबंध दृढ करणारी भेट

या भेटीत जेडी वान्स आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. ही भेट त्यांच्यासाठी वैयक्तिक संबंध दृढ करणारी ठरली. तसंच, त्यांनी भारत भेटीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या. त्या म्हणाल्या, “एक कठपुतळी कार्यक्रम होता. तिथे देशभरातून काही कठपुतळी कलाकार आले होते. यातून रामायणातील काही भागही दाखवण्यात आले. तसंच, विनोदी कार्यक्रमही येथे झाले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेच्या उपाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जे. डी. वान्स पहिल्यांदाच भारतात आले होते. ते जवळपास चार दिवस त्यांच्या कुटुंबियांबरोबर भारतात राहिले. जे. डी. वान्स यांच्या पत्नी उषा वान्स या मुळच्या भारतीय असून आंध्र प्रदेशातील आहेत. त्या अस्खलित तेलुगु भाषा बोलतात. तसंच, त्या भारतीय संस्कृतीशी खोलवर जोडलेल्या असल्याचं सांगितलं जातं.