अमेरिकेची तपास संस्था एफबीआयनं काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या फ्लोरिडा येथील घरावर छापेमारी केली होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात १५ बॉक्स सापडल्याचा खुलासा एफबीआयनं केला आहे. यापैकी १४ बॉक्समधून अमेरिकेच्या सुरक्षेशी संबंधित गुप्त कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. एफबीआयनं याबाबत एक शपथपत्र जारी करून छाप्यांचं स्पष्टीकरण दिलं. ३२ पानी प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी तपासाशी संबंधित अनेक माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा- ३० लाख लोक झाले बेघर, ३४३ मुलांसहीत ९३७ जणांचा मृत्यू; पाकिस्तानने जाहीर केली राष्ट्रीय आणीबाणी

एफबीआयचे प्रतिज्ञापत्र सार्वजनिक

एफबीआयने ३२ पानांच्या प्रतिज्ञापत्रात असे म्हटले आहे की, छाप्यांमध्ये जप्त केलेली कागदपत्रे ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात व्हाईट हाऊसमधून आणली होती. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून खटला चालविला जात आहे. न्याय विभागाने एफबीआयचे प्रतिज्ञापत्र सार्वजनिक केले आहे. न्यायाधीश ब्रूस रेनहार्ट यांनी गुरुवारी याबाबतचे आदेश दिले. या तपासाबाबत सर्वसामान्यांनाही माहिती मिळावी असे आदेशही न्यायधीशांनी दिले आहेत.

हेही वाचा- “आईच्या धार्मिक मान्यांमुळे माझं आयुष्य उद्धवस्त झालं”; शिंजो आबेंच्या हल्लेखोराला होतोय पश्चाताप

ट्रम्प यांच्याकडून हेरगिरी कायद्याचे उल्लंघन

ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक लढवता येऊ नये म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. एफबीआयच्या म्हणण्यानुासार ट्रम्प यांनी राहत्या घरी गुप्त कागदपत्रे ठेवून हेरगिरी कायद्याचे उल्लंघन केले आहे. जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये ११ कागदपत्रे अत्यंत गोपनीय आहेत.

पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जी कागदपत्रे विशेष सरकारी सुविधांमध्ये सुरक्षित ठेवायला हवी होती, ती ट्रम्प यांच्याकडे कशी होती? असा प्रश्न अमेरिकेच्या न्याय विभागाने विचारला आहे. गोपनीय कागदपत्रे घरी ठेवल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर नुकसान पोहचू शकते असेही न्यायलयाचे म्हणणे आहे. या प्रकरणात ट्रम्प दोषी आढळल्यास त्यांना किमान पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.