मानवाधिकार परिषदेत सुधारणा होत नाही म्हणून अनेक दिवसांपासून अमेरिकेकडून संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याची धमकी दिली जात होती. अखेर त्यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो आणि संयुक्त राष्ट्र परिषदेत अमेरिकेचे दूत असलेले निकी हेली यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन याबाबत घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


47 देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेली ही परिषद इस्रायलविरोधी असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेचा सदस्य होता. या परिषदेत अमेरिकेला नुकतंच दीड वर्ष पूर्ण झालं होतं. अमेरिकेच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या नाहीत असं वृत्त काही दिवसांपासून आलं होतं. तेव्हापासूनच अमेरिका संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. याबाबत केवळ अधिकृत घोषणा झाली नव्हती.

यापूर्वी अमेरिकेने माजी राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या कार्यकाळातही तीन वर्षांसाठी मानवाधिकार परिषदेवर बहिष्कार टाकला होता. त्यानंतर बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाले आणि अमेरिका पुन्हा या परिषदेत सहभागी झाला होता. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा अमेरिकेने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us withdraw from un human rights council
First published on: 20-06-2018 at 08:12 IST