देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे नागरिक चिंतेत आहेत. झपाट्याने पसरलेल्या या लाटेने कहर केला. तसेच करोनाची तिसरी लाट येणार असल्याची शंका देखील तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे देशात लसीकरण केले जात आहे. मात्र बरेच लोकं लसीकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत. यावर उपाय म्हणून उत्तर प्रदेशातील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी एक अजब नियम केला आहे. या नियमामुळे उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील सैफईमधील प्रत्येक दारूच्या दुकानासमोर चर्चा सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या शहरात लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र नसेल तर दारू मिळणार नाही, अशी नोटीस लावण्यात आली आहे. ही नोटीस अतिरिक्त जिल्हाधिकारी हेम कुमार सिंह यांच्या निर्देशानुसार लावण्यात आली आहे. या अजब आदेशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

हेम कुमार सिंग यांनी अलीगढ़मध्ये विषारी दारूच्या सेवनामुळे झालेल्या अनेक मृत्यूनंतर ही सूचना देण्यात आली आहे. अलीगड विषारी दारू घोटाळ्यानंतर हेम कुमार सिंह यांनी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांसह सैफई येथील दारू दुकानांची तपासणी केली. दरम्यान, हेम कुमार सिंग यांनी दारू दुकानांना स्पष्टपणे ‘लस नाही तर दारू नाही’ अशी नोटीस लावण्याच्या सूचना दिल्या. या महिन्याच्या सुरूवातीला अलिगडमध्ये विषारी दारू पिऊन कमीतकमी २५ जणांचा मृत्यू झाला होता.

आणखी वाचा – उत्तर प्रदेश : करोना रुग्णाचा मृतदेह पुलावरुन नदीमध्ये फेकणाऱ्यांची ओळख पटली; गुन्हा दाखल

सैफई येथील मद्य दुकानांच्या कर्मचाऱ्यांनीही याची पुष्टी केली. ते म्हणाले की. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले आहे की, असे केल्याने अधिकाधिक लोक लस घेतील. मात्र इटावा जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी कमल कुमार शुक्ला म्हणाले की, ज्यांना अद्याप दारू मिळालेली नाही त्यांना दारू विक्री करण्यापासून थांबविण्याचे कोणतेही आदेश देण्यात आले नाहीत. मात्र, लसीकरणाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळायला हवे, परंतु दारू खरेदीला लस प्रमाणपत्र देण्याचे आदेश नाहीत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaccination certificate required for purchase of alcohol in up srk
First published on: 31-05-2021 at 08:50 IST