Vande Bharat Express Train Accident : गुजरातमधील मनीनगर याठिकाणी ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ अपघात झाला आहे. या अपघातात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वेच्या समोरील भागाचं नुकसान झालं आहे. संबंधित रेल्वे गांधीनगरहून मुंबईला येत असताना काही जनावरे लोहमार्गात आडवी आल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या रेल्वेच्या समोरील भागाचं नुकसान झालं असलं तरी रेल्वे सेवेवर कोणाताही परिणाम झाला नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर १ ऑक्टोबरपासून ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली होती. सेवेत दाखल झाल्यानंतर अवघ्या सहाव्याच दिवशी ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला अपघात घडला आहे. आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास वटवा ते मनीनगर दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणारी सेमी हायस्पीड रेल्वे आहे. ही रेल्वे २०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. यामुळे अहमदाबाद ते मुंबई हा प्रवास प्रवाशांसाठी सुकर ठरत आहे.