scorecardresearch

सरकारस्थापनेसाठी वसुंधरा राजेंचा दावा

राजस्थानमध्ये कॉंग्रेसला धूळ चारत भाजपने बहुमत प्राप्त केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार वसुंधरा राजे यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.

राजस्थानमध्ये कॉंग्रेसला धूळ चारत भाजपने बहुमत प्राप्त केल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार वसुंधरा राजे यांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला. राजे यांनी मंगळवारी आ.गुलाबचंद कटारिया व पक्षाच्या अन्य दोन नेत्यांसह राजभवनात जाऊन राज्यपाल मार्गारेट अल्वा यांची भेट घेतली आणि सरकारस्थापनेबाबत चर्चा केल्याची माहिती राज भवनच्या सूत्रांनी दिली. राजे यांची सोमवारी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली असून १३ डिसेंबरला त्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील़

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vasundhara raje to take oath as rajasthan cm

ताज्या बातम्या