scorecardresearch

Premium

शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात रामायण, भगवद् गीता अन् वेद शिकवणार; नवीन शिक्षण धोरणानुसार ‘या’ राज्याने सुरु केली तायरी

नवीन शिक्षण धोरणं लागू करणारं हे पहिलं राज्य ठरणार असून शिक्षण मंत्र्यांनीच यासंदर्भातील माहिती दिलीय

Dhan Singh Rawat
राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनीच व्यक्त केलं मत (फोटो ट्विटरवरुन साभार)

उत्तराखंडचे शिक्षण मंत्री धन सिंह रावत यांनी वेद, रामायण आणि भगवद् गीतेवर आधारित अभ्यासक्रम शाळांमध्ये शिकवला गेला पाहिजे असं मत व्यक्त केलंय. शालेय शिक्षणामध्ये हिंदू धर्मांमधील ग्रंथ आणि वेदांचा समावेश करण्यात आला पहिजे असं शिक्षण मंत्र्यांनी म्हटलंय.

धन सिंह रावत यांनी उत्तरखंडचा इतिहास आणि भौगोलिक परिस्थितीबद्दल म्हणजेच भूगोलाबद्दल शिकवलं जाणार आहे असंही सांगितलं,

himachal pradesh
हिमाचल प्रदेशमध्ये राजकीय नाट्य; क्रॉस वोटिंगमुळे काँग्रेस अडचणीत, भाजपाकडून बहुमत चाचणीची मागणी
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
What Amit Shah Said?
ईडी कारवाया किती टक्के राजकारण्यांवर? अमित शाह म्हणाले….
karnataka
कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसकडून पाकिस्तान जिंदाबादचे नारे? भाजपाने शेअर केला VIDEO

नवीन शैक्षणिक धोरणानुसार भारतीय इतिहासावर आणि परंपरांवर आधारित शैक्षिणक धोरण तयार केलं जाणार असल्याचं उत्तराखंडच्या शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं. वेद पुराण आणि गितेसहीत स्थानिक भाषांनाही अभ्यासक्रमामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे असंही ते म्हणाले.

देशात लागू झालेलं नवीन शिक्षण धोरण अंमलात आणणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरणार आहे. “लवकरच नवीन अभ्यासक्रम तयार केला जाईल. मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब लवकरच केल जाणार नाही,” असंही शिक्षण मंत्री म्हणाल्याचं वृत्त इंडिया टुडेने दिलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तराखंडचा इतिहास, राज्य निर्मितीचा इतिहास आणि राज्यातील थोर व्यक्तींचा इतिहास विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकवला जाणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vedas ramayana gita should be taught in schools of uttarakhand education minister

First published on: 02-05-2022 at 13:12 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×