कर्नाटकातील शिवमोगा येथे मागील आठवड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यास एका गटाने आक्षेप घेतल्याने, दोन गटांत संघर्ष झाला होता. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता पुन्हा एक नवीन वाद निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. याला कारण म्हणजे कर्नाटकातील शालेय पाठ्यपुस्तकातील वीर सावरकरांबद्दलचा एक धडा आहे.

“वीर सावरकर सेल्युलर जेलमध्ये जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, तेव्हा ते बुलबुल पक्षाच्या पंखांवर बसून मायदेशी यायचे.” असे शालेय पाठ्यपुस्तकातील परिच्छेदात नमूद असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे या पाठ्यपुस्तकातील अतिशयोक्तीची चर्चा आता सोशल मीडियावर देखील चांगलीच सुरू झाली आहे. यामुळे राज्यात पाठ्यपुस्तक पुनरावृत्तीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. तर, शिक्षण विभागाने इयत्ता आठवी साठीच्या या पाठ्यपुस्तकातील हा धडा बदलला आहे. रोहित चक्रतीर्थ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती, या समितीने हा धडा कानडी भाषेच्या पाठ्य पुस्तकात समाविष्ट केला होता. नंतर ही समिती बरखास्त करण्यात आली होती.

‘ब्लड ग्रुप’ या मागील धड्याच्या जागी के.के.गट्टी यांच्या ‘कलावानू गेद्दावरू’ या धड्याचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला होता. वीर सावरकरांना जिथे ठेवण्यात आले होते त्या अंदमान सेल्युलर तुरुंगास लेखकाने दिलेल्या भेटीच्या प्रवास वर्णनाचा हा धडा आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, “सेल्युलर तुरुंगात सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते, परंतु त्यांच्या या कोठडीत एक बुलबुल पक्षी यायचा आणि सावरकर त्याच्या पंखांवर बसून दररोज मायदेशी यायचे. ही कोठडी पूर्णपणे बंद होती, तरी देखील बुलबुल पक्षी यायचा आणि सावरकारंना मातृभूमीचे दर्शन घडवायचा.”

या अशोयक्तीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. शिवाय, या धड्यातील त्या वादग्रस्त परिच्छेदाचा फोटो देखील व्हायरल होत आहे. या प्रकरणी पाठ्यपुस्तक समितीकडे तक्रार करण्यात आली असून, पाठ्यपुस्तक समितीने या तक्रारीची दखल घेत चौकशी सुरू केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धड्याच्या एका परिच्छेदात सावरकरांचा गौरव केल्याच्या कारणावरून अनेकांकडून आक्षेपही घेण्यात आला आहे. याआधी कोणताही आक्षेप घेण्यात आला नसला तरी, हा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही तासांनी कर्नाटक टेक्स्टबुक सोसायटी (केटीबीएस)ला अनेक तोंडी तक्रारी आल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

कर्नाटकचे शालेय शिक्षणमंत्री म्हणतात… –

या प्रकरणावर शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे मंत्री बी.सी. नागेश यांनी द हिंदूला प्रतिक्रिया देताना सांगितले की, “सावकर हे महान स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचा कितीही गौरव झाला तरी तो त्यांच्या त्यागासाठी पुरेसा नाही. लेखकाने त्या धड्यात जे वर्ण केले आहे ते अचूक आहे.”