“मी भारतीयांचा तिरस्कार करते, तुम्ही परत भारतात जा,” असं म्हणणाऱ्या एका महिलेला अमेरिकेत अटक झाली आहे. आरोपी महिलेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आरोपी महिला या व्हिडीओत चार भारतीय अमेरिकन महिलांवर टीका करताना दिसत आहे. टेक्सास पोलिसांनी आरोपी महिलेवर कारवाई केली.

ही घटना टेक्सासमधील दल्लास येथे बुधवारी (२४ ऑगस्ट) रात्री घडली. या व्हिडीओतील महिला स्वतः मेक्सिकन अमेरिकन असल्याचं सांगत आहे. तसेच चार भारतीय वंशाच्या अमेरिकन महिलांचं मानसिक शोषण करताना दिसत आहे. आरोपी महिला म्हणाले, “मी तुम्हा भारतीयांचा तिरस्कार करते. या सगळ्या भारतीयांना चांगलं आयुष्य हवं असतं म्हणून ते अमेरिकेत येतात.”

व्हिडीओ पाहा :

हा व्हिडीओ जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनाही या व्हिडीओनंतर धक्का बसला आहे. आरोपी मेक्सिकन अमेरिकन महिलेचं नाव इस्मराल्डा युप्टॉन आहे.

हेही वाचा : मेक्सिकोत वर्णभेदभदातून १४ वर्षीय विद्यार्थ्याला जाळल्याची घटना; शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्याने माझी आई आणि तिच्या तीन मैत्रिणींना डिनरसाठी दल्लास (टेक्सास) येथे गेल्यावर हे अनुभवावं लागलं असं म्हटलंय. यानंतर ट्विटरवर अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत वर्णभेद आणि द्वेषावर सडकून टीका केलीय. तसेच आरोपी महिलेवर कारवाईची मागणी झाली.”