Rahul Gandhi Sonia Gandhi Viral Video: काँग्रेसचे नेते राहुल गांधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी लाडात आपल्या आईचे म्हणजेच सोनिया गांधींचे गाल खेचताना दिसत आहेत. काँग्रेसच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने नवी दिल्लीमधील काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान हा व्हिडीओ आहे.

राहुल गांधी हे सोनिया आणि एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याबरोबर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी राहुल यांनी लाडात आपल्या आईचे गाल खेचले. राहुल गांधींनी हसत गाल खेचल्यानंतर सोनिया गांधींनीही तितक्याच प्रेमाने राहुल यांचा हात आपल्या गालावरुन काढला. त्यानंतर त्यांनी शेजारी बसलेल्या काँग्रेसच्या वरिष्ठ महिला नेत्याकडे हसत हसत राहुल यांची तक्रार केली.

मायलेकामधील हा आगळावेगळा क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तुम्हीच पाहा व्हिडीओ…

Video: Congress MP Rahul Gandhi had a joyful moment with his mother Sonia Gandhi

काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त आज काँग्रेसचे अनेक नेते नवी दिल्लीमधील मुख्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळेस काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांनी सरकारवर टीका केली. भारतामधील मूलभूत तत्वावर सातत्याने हल्ले होत असून समाजात द्वेषाच्या आधारे दुफळी निर्माण करण्याचं काम केलं जात असल्याचं खर्गे म्हणाले.

आणखी वाचा – पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींची प्रकृती स्थिर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महागाई, बेरोजगारीसारख्या समस्यांबद्दल सरकारला काहीही पडलेलं नाही अशी टीकाही खर्गे यांनी केली. सर्वांचा समावेश करुन एकत्रितपणे विकास साधण्याच्या काँग्रेसच्या दूरदृष्टीमुळे भारताचा विकास झाला असंही खर्गे म्हणाले. भारत काही वर्षांमध्ये यशस्वी आणि सक्षम लोकशाही म्हणून नावारुपास आला. त्यानंतर काही दशकांमध्ये भारत आर्थिक, अण्विक आणि धोरणामत्मक स्तरावर जागतिक स्तरावरील प्रभावशाली देशांपैकी एक ठरला. भारत सध्या शेती, शिक्षण, वैद्यकीय क्षेत्र, माहिती तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात अव्वल असल्याचंही खर्गे म्हणाले.