भारताला आता मुस्लिमुक्त करण्याची वेळ आली आहे, असे विधान करून विश्व हिंदू परिषदेच्या (विहिंप) नेत्या साध्वी प्राचीने नव्या वादाला तोंड फोडले आहे. रूरकी येथे झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भारताला काँग्रेसमुक्त करण्याचे ध्येय आपण साध्य केले आहे. आता देशाला मुस्लिममुक्त करण्याची वेळ आली आहे. आम्ही त्यासाठी काम करत आहोत, असे साध्वी प्राची हिने म्हटले आहे. साध्वी प्राचीने यावेळी बॉलीवूड कलाकार शाहरूख खान आणि आमिर खान यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. शाहरूखचे दोन चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आज त्याला हिंदूंची आठवण येत आहे. आमिरचा आगामी ‘दंगल’ चित्रपटही फ्लॉप झाला पाहिजे. शाहरूख आण आमिर खान भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गातात. या दोघांना त्यांची लायकी दाखवून द्या, असे आवाहनही साध्वीने केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jun 2016 रोजी प्रकाशित
VIDEO : भारताला मुस्लिममुक्त करण्याची वेळ आलीय- साध्वी प्राची
भारताला काँग्रेसमुक्त करण्याचे ध्येय आपण साध्य केले आहे.

First published on: 08-06-2016 at 12:15 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video it is time to make india free of muslims says sadhvi prachi