राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांना निवडणूक न लढवताच भाजपच्या मंत्रिमंडळात केंद्रात मंत्री होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते-पाटील यांना माढ्याच्या उमेदवारीत डावलल्याने त्यांच्या समर्थकांत मोठी नाराजी होती. चंद्रकांत दादा पाटील यांनी अकलूज येथील भाजपा उमेदवाराच्या मेळाव्यात मोहिते पिता-पुत्रांना देशाच्या आणि राज्याच्या सत्तेत सहभागी करून घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे निवडणूक न लढवता मोहिते पाटील पिता-पुत्रांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण विजयसिंह मोहिते पाटील यांनी अजून भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, मात्र रविवारी करमाळ्यात भाजपाने आयोजित केलेल्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी व्यासपीठावर हजेरी लावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. विजयसिंह मोहिते- पाटील व त्यांच्या चिरंजीवांना भाजपमध्ये आल्याचे दुःख होणार नाही, असे जाहीर आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay dada mohite patil and son will be in the power bjp central government
First published on: 01-04-2019 at 15:17 IST