सर्वोच्च न्यायालयाने विजय माल्याला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दोन हजारांचा दंडही ठोठावला आहे. यासोबतच माल्याने कुटुंबियांना पाठवलेले ४० दशलक्ष डॉलर्सही परत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून फरार झालेल्या माल्ल्याला सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी दोषी ठरवला होते. डिएगो डीलचे ४० दशलक्ष त्याच्या मुलांच्या परदेशातील खात्यांमध्ये हस्तांतरित केल्याबद्दल आणि मालमत्तेची योग्य ती माहिती न दिल्याबद्दल माल्याला दोषी ठरविण्यात आले होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विजम माल्ल्या युनायटेड किंगडममध्येच आहेत. तेथे त्याने काही कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. यूके सरकारने या प्रक्रियेत भारत सरकारला पक्ष बनवलेले नाही किंवा त्याची माहिती भारत सरकारसोबत शेअर केली नाही. त्यामुळे माल्ल्याला अद्याप भारतात आणण्यात यश आले नाही, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यालाया दिली आहे.