विजय मल्ल्याला लंडन कोर्टाने ४ डिसेंबर पर्यंत जामीन मंजूर केला आहे. तसेच याप्रकरणाची पुढची सुनावणी ६ जुलैला होणार आहे. त्यामुळे लंडन कोर्टाकडून विजय मल्ल्याला काही अंशी  दिलासाच मिळाला आहे. कोर्टाबाहेर आल्यावर विजय मल्ल्याला प्रश्न विचारण्यासाठी पत्रकारांनी गर्दी केली होती. त्यावेळी एका पत्रकाराने विजय मल्ल्याला चोर-चोर च्या घोषणाबाजीबाबत प्रश्न विचारला. ज्यानंतर विजय मल्ल्या पत्रकारावर चांगलाच चिडला. तुम्हाला काहीही माहिती नसेल तर प्रश्न विचारत जाऊ नका गप्प बसा असे विजय मल्ल्याने म्हटले आहे. तसेच कोर्टात हजेरी लावतानाच, मी कोणताही गुन्हा केलेला नाही, कोणाचीच फसवणूक केली नाही, असे म्हणत कर्जबुडव्या विजय मल्ल्याने आपल्यावरचे सगळे आरोप फेटाळले होते. आता विजय मल्ल्याला ४ डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज झालेल्या सुनावणी साठी विजय मल्ल्या आपल्या मुलासाह हजर झाला होता. त्यावेळी त्याने आपल्यावरचे आरोप फेटाळले आहेत. तसेच मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे सबळ पुरावे आहेत असेही विजय मल्ल्याने कोर्टाबाहेर जमलेल्या पत्रकारांना सांगितले होते. कर्जबुडव्या विजय मल्ल्याविरोधात आज लंडन कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीआधी तो कोर्टात दाखल झाला त्यावेळी त्याने हे वक्तव्य केले आहे.

भारतातल्या बँकांचे ९ हजार कोटी बुडवून विजय मल्ल्या ब्रिटनला पळाला आहे. भारताने केलेल्या तक्रारीनंतर एप्रिल महिन्यात स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला तासाभरात जामीन दिला होता आणि सोडण्यात आले होते. सध्या विजय मल्ल्या जामिनावर मुक्त आहे. आता कर्जबुडव्या विजय मल्ल्याविरोधात लंडन कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. खरेतर १३ मे रोजी ही सुनावणी होणार होती मात्र ती महिन्याभरासाठी पुढे ढकलण्यात आली. आता याप्रकरणातली पुढची सुनावणी ६ जुलै रोजी होणार आहे.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay mallyas hearing in london court today
First published on: 13-06-2017 at 13:48 IST