भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मुहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून देशभरात निदर्शने होत आहेत. पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात आज पुन्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ७० जणांना अटक करण्यात आली आहे. प्रशासनाने हावडा जिल्ह्यात १३ जूनपर्यंत इंटरनेट सेवा बंद केली आहे. त्याचबरोबर हावडामधील अनेक भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हिंसाचारासाठी भाजपला जबाबदार धरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले की, “हावडामध्ये हिंसक घटना घडत आहेत, त्यामागे काही राजकीय पक्ष आहेत आणि त्यांना दंगल घडवायची आहे, परंतु हे सहन केले जाणार नाही. या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल. हावडा जिल्ह्यातील डोमजूर पोलीस ठाण्याची आज तोडफोड करण्यात आली. आंदोलकांनी अनेक दुकाने फोडली. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.


सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत इंटरनेट बंद

गृह आणि डोंगरी व्यवहार विभागाने जारी केलेल्या आदेशात सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत इंटरनेट बंद राहणार असल्याचे म्हटले आहे. व्हॉईस कॉल आणि एसएमएस सेवा सुरू राहतील, असे आदेशात म्हटले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आहे आणि पोलिसांनी हावडामधील सलाप आणि उलुबेरियामधील ब्लॉक केलेले रस्ते मोकळे केले आहेत. धुलागड, पांचाला आणि उलुबेरिया येथे आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग ६ ची नाकेबंदी उघडण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violence erupts again today in howrah mamata says bjp hand behind the riots dpj
First published on: 11-06-2022 at 15:28 IST