Premium

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, पाच जणांचा मृत्यू; अमित शाह आज देणार हिंसाचारग्रस्त भागांना भेट

Manipur Violence : गेल्या दोन दिवसांपासून इम्फाळ खोऱ्यांतही नागरिकांवरील हल्ले वाढले आहेत. हे हल्ले सुनियोजित असून त्याचा तीव्रपणे निषेध करतो, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

manipur violence live update
मणिपूरमध्ये हिंसाचार का उफाळला?

मैतेई आणि कुकी या दोन समुदायांमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाचा भडका शमताना दिसत नाहीय. काल (२८ मे) मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. तर, १२ जण जखमी झाले आहेत. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अत्याधुनिक शस्त्रे घेऊन आलेल्या कथित दहशतवाद्यांनी सेरू आणि सुगुनु भागात अनेक घरांना आग लावली. त्यामुळे या भागात हिंसाचार भडकला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मणिपूरमध्ये भेट घेणार आहेत. त्यांच्या भेटीआधीच मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्याने चिंता व्यक्त केली जातेय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-05-2023 at 10:35 IST
Next Story
भारतीय लष्करात आता ‘क्रॉस पोस्टिंग’, तिन्ही सैन्यदलांमध्ये मनुष्यबळाची होणार अदलाबदल!