उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एका दौऱ्यासाठी गेले होते तिथे एक खास बाब पाहण्यास मिळाली. मुख्यमंत्र्यांच्या आगमनाच्या आधी जिल्हाधिकारी कृतिका ज्योत्स्ना आणि पोलीस अधीक्षक अभिनंदन यांनी रस्त्यावर उसेन बोल्टच्या वेगाने धाव घेतली. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे दोघंही मुख्यमंत्री येण्यााधी धावत गेले कारण त्यांना तिथे पोहचायला उशीर झाला होता.

बस्ती या ठिकाणचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेशातील बस्ती या ठिकाणी सोमवारी ही घटना घडली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नंदाबाबा यांच्या मृत्यूनंतर झालेल्या श्रद्धांजली सभेसाठी येणार होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येण्याच्या बरोबर काही वेळ आधी जिल्हाधिकारी कृतिका ज्योत्स्ना आणि पोलीस अधीक्षक अभिनंदन वेगाने धावले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना श्रद्धांजली सभेच्या ठिकाणी लवकर पोहचवण्यासाठी जिल्हाधिकारी धावल्या. मात्र या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नंदाबाबा यांचा मृत्यू ३ नोव्हेंबरच्या रात्री झाला.

नेमकं काय काय घडलं?

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं हेलिकॉप्टर श्री कृष्ण पांडेय शाळेच्या मैदानात उतरलं त्यावेळी जिल्हाधिकारी कृतिका या धावत कारजवळ पोहचल्या. जिल्हाधिकारी कृतिका ज्योत्स्ना या धावत कारमध्ये बसल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येण्याआधी त्या जिल्हाधिकारी पीटी उषा प्रमाणे धावत तिथे पोहचल्या. सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. मुख्यमंत्री बस्ती या ठिकाणी आले तेव्हा अधिकारी सुरक्षा व्यवस्था बघत होते. दरम्यान पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.