Vladimir Putin on India and Superpower Nations : “इतर कुठल्याही देशापेक्षा भारताची अर्थव्यवस्था जलद गतीने वाढत असून, जागतिक महासत्तांच्या यादीमध्ये समावेश करण्यास भारत पात्र आहे”, असे प्रतिपादन रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले. सोची येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. पुतिन म्हणाले, “रशिया भारताशी सर्व बाजूंनी संबंध दृढ करीत आहे आणि दोन्ही देशांमध्ये कमालीचा विश्वास आहे. जगात भारताची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यात दर वर्षी एक कोटींनी वाढ होत आहे. अब्जाहून अधिक लोकसंख्या आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, प्राचीन संस्कृती आणि आश्वासक भविष्य पाहता महासत्तांच्या यादीत भारताचा समावेश निःसंशय व्हायला हवा”.

रशियाचे अध्यक्ष म्हणाले, “भारत हा गेल्या अनेक दशकांपासून आमचा मित्र आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमधला भागिदार राहिला आहे”. यावेळी पुतिन यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सोव्हिएत युनियनच्या भूमिकेवरही प्रकाश टाकला. तसेच ते म्हणाले, “भारताचा जागतिक महासत्तांच्या यादीत समावेश व्हायला हवा. भारत त्या सन्मानास पात्र आहे. तब्बल दीड अब्ज लोकसंख्या असलेल्या या देशाचा विकास दरही वेगवान आहे. त्यांच्याकडे प्राचीन संस्कृती आहे. त्याचबरोबर विकासाची मोठी क्षमता देखील आहे”.

justin trudeau accepts Khalistani supporters in Canada
Canadian PM Justin Trudeau: सर्वच हिंदू मोदी समर्थक नाहीत, कॅनडाच्या पंतप्रधानांची टीका; म्हणाले “आमच्याकडे खलिस्तानी…”
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
bomb explosion at railway station in Quetta pakistan
Pakistan Blast: पाकिस्तानच्या क्वेटा रेल्वे स्थानकावर भीषण बॉम्बस्फोट, २१ लोकांचा मृत्यू
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
visa sponsored job in britain
भारतीय तरुणी यूकेमध्ये अडचणीत; “मी फुकटात काम करेन, पण मला नोकरी द्या”, सोशल पोस्ट व्हायरल!

हे ही वाचा >> Canadian PM Justin Trudeau: ‘सर्व हिंदू मोदी समर्थक नाहीत’, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडोंचे विधान; देशात खलिस्तानी असल्याची दिली कबुली

व्लादिमीर पुतिन काय म्हणाले?

सोची येथे वल्दाई डिस्कशन क्लबला संबोधित करताना पुतिन म्हणाले, “भारत एक महान देश आहे. या महान देशाशी आपले अनेक दशकांपासून उत्तम संबंध आहेत. मॉस्को व नवी दिल्ली विविध क्षेत्रांमध्ये भागिदार आहेत आणि ही भागिदारी दिवसेंदिवस वाढवत आहोत. भारताचा जीडीपी ७.४ टक्क्यांनी वाढतोय. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आमचं सहकार्य वाढत आहे. भारताच्या स्वातंत्र्यालढ्यापासून उभय देशांमध्ये गुणवत्ता, विश्वास व सहकार्यामुळे अद्वितीय संबंध निर्माण झाले. या दोन देशांमधील द्विपक्षीय व्यापार हा तब्बल ६० अब्ज डॉलर्सचा आहे”.

हे ही वाचा >> जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल

“आमचे संबंध एवढे घनिष्ठ की कोणत्याही अनुवादकाची गरज नाही”, मोदींबाबत पुतीन यांची मिश्किल टिप्पणी

दोन आठवड्यांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर गेले होते. रशियातील कझान शहरात पार पडलेल्या १६ व्या ‘ब्रिक्स’ शिखर परिषदेत ते सहभागी झाले होते. त्यावेळी व्लादिमीर पुतिन यांनी रशिया आणि भारत या दोन्ही देशातील घनिष्ठ संबंधांबाबत भाष्य केलं. मॉस्को आणि नवी दिल्ली यांच्यातील संबंधांना विशेष विशेषाधिकार आहे आणि ते गतिमानपणे विकसित होत आहेत, असं पुतिन त्यावेळी म्हणाले होते. तसेच ‘आमचे संबंध एवढे घनिष्ठ आहेत की आम्हाला कोणत्याही अनुवादकाची गरज नाही’, अशी मिश्किल टिप्पणी पुतिन यांनी केली. पुतिन यांच्या या टिप्पणीचा हिंदी अनुवाद ऐकून पंतप्रधान मोदीही हसले.

Story img Loader