वृत्तसंस्था, गाझा, जेरुसलेम

इस्रायल आणि हमासदरम्यान सुरू असलेले युद्ध अजून काही महिने चालेल असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी दिला. त्याच वेळी इस्रायली सैन्याने शनिवारी रात्री आणि रविवारी मध्य गाझावरील हल्ले अधिक तीव्र केले अशी माहिती तेथील रहिवाशांनी आणि स्थानिक माध्यमांनी दिले. या हल्ल्यांमध्ये निर्वासितांच्या छावण्या आणि इमारतींचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Tesla chief, Elon Musk, electric car, investment, india
‘टेस्ला’कडून भारतात २ ते ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक? एलॉन मस्क यांच्या दौऱ्यादरम्यान घोषणा होण्याचा अंदाज
Israel use of AI in war revealed in reports by Israeli and Palestinian journalists
इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा
iran attack israel
जग पुन्हा युद्धाच्या छायेत; इराण पुढच्या ४८ तासांत इस्रायलवर हल्ला करणार, भारताने नागरिकांना दिला इशारा…

मध्य गाझामधील, पॅलेस्टिनींनी मोठय़ा प्रमाणात आश्रय घेतलेल्या अल-मागझी आणि अल-बुरेजी या दोन शिबिरांना इस्रायलच्या लढाऊ विमानांनी लक्ष्य केले. ‘रेड क्रेसेंट’ या मदत संस्थेने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीमध्ये मध्य गाझामधील हवाई हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या लहान मुलांना घेऊन जाणारे बचावकर्ते दिसत होते. या युद्धामध्ये आतापर्यंत मरण पावलेल्या पॅलेस्टिनींची संख्या २१ हजार ८०० पेक्षा जास्त झाली आहे. त्याशिवाय युद्धामध्ये उद्ध्वस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली कित्येक मृतदेह पडून असल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>>IIT BHU मधील सामूहिक बलात्कार प्रकरण; तिन्ही आरोपी भाजपा आयटी सेलचे सदस्य? पक्षाने स्पष्ट केली भूमिका

नेतान्याहूंचा राजीनाम्यास नकार

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांच्या लोकप्रियतेमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे विविध मतदान चाचण्यांमधून दिसत आहे. मात्र, आपण राजीनामा देणार नाही असे नेतान्याहू यांनी सांगितले.